सासष्टी : मानवी तस्करी, फसवणुकीप्रकरणी मडगावातील एकास अटक

कथित बलात्कार प्रकरण : परवानाधारक एजंट असल्याचे सांगत फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th March, 05:16 pm
सासष्टी : मानवी तस्करी, फसवणुकीप्रकरणी मडगावातील एकास अटक

मडगाव : परवानाधारक एजंट असल्याचे सांगत पीडितेला कॉल करुन मोठ्या पगारासह केअरटेकर म्हणून नोकरीचे आमिष दाखवणे, कोंब मडगाव येथील एकाकडून आगावू पैसे घेत ते पीडित युवतीला न देणे तसेच मानवी तस्करीप्रकरणी संशयित शब्रिश अशोक मांजरेकर (३२, रा. बोर्डा) याला मडगाव पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शब्रिशने आपण परवानाधारक एजंट असल्याचे सांगत पीडितेला नोकरी देण्याचे आमिष दाखवले. कामासाठी कामगार देण्याचे आश्वासन देत कोंबमधील एका व्यक्तीकडून २५ हजारांची रक्कम घेण्यात आली पण ती रक्कम सदर केअरटेकर युवतीला दिली नाही. कथित बलात्कार प्रकरणात चौकशी करण्यात येत असताना ही बाब समोर आली आहे. त्यानुसार मडगाव पोलिसांकडून संशयित शब्रिश मांजरेकर याच्याविरोधात फसवणूक व  मानवी तस्करीप्रकरणी गुन्हा नोंद करत अटक करण्यात आलेली आहे.

कथित बलात्कार प्रकरणात सदर युवतीची कोणतीही तक्रार नसल्याचे तिने प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले होते. त्याशिवाय न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर झालेल्या जबाबावेळीही युवतीने लैंगिक अत्याचार झालेला नसल्याचे स्पष्ट केलेले होते. त्याशिवाय पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याने वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. जबाब नोंद झाल्यानंतर सदर युवतीची वैद्यकीय तपासणी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात करण्यात आली आहे. युवतीला परराज्यातील आपल्या गावी परत जायचे असून पोलिसांच्या प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहण्यात येत असल्याचे समजते.


हेही वाचा