गोवा : ‘ब गट’ मराठी नाट्यस्पर्धेत ‘प्रिजनर्स ऑफ वॉर’ प्रथम

‘सिमेवरून परत जा’ नाटकाला द्वितीय पारितोषिक : ॐ कलासृष्टी, बांदोडा-फोंडाचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटक तृतीय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
39 mins ago
गोवा : ‘ब गट’ मराठी नाट्यस्पर्धेत ‘प्रिजनर्स ऑफ वॉर’ प्रथम

पणजी : कला अकादमी गोवा (Kala Academy Goa) आयोजित ५६ व्या ‘ब गट’ मराठी नाट्यस्पर्धेच्या (B group drama Marathi competition) निकालाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत ‘प्रिजनर्स ऑफ वॉर’ या नाटकाने ५०,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. हे नाटक श्री साई दिगंबर क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ, आसगाव-बार्देश यांनी सादर केले होते.

४०,००० रुपयांचे द्वितीय पारितोषिक ‘सिमेवरून परत जा’ या नाटकाला मिळाले. हे नाटक होमकुंड रंगभूमी, मडकई-फोंडा यांनी सादर केले होते. ३०,००० रुपयांचे तृतीय पारितोषिक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाला देण्यात आले असून ते ॐ कलासृष्टी, बांदोडा-फोंडा यांनी ते सादर केले होते. २०,००० रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक ‘चाणक्य विष्णुगुप्त’ या नाटकाला मिळाले. हे नाटक श्री भूमिका नाट्य मंडळ, पर्ये-मठ-साखळी यांनी सादर केले होते.
उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक प्रसाद प्रेमानंद कळंगुटकर (नाटक प्रिजनर्स ऑफ वॉर) यांना, अशोक गिमोणकर (नाटक सिमेवरून परत जा) यांना द्वितीय आणि संदीप फडते (नाटक रायगडाला जेव्हा जाग येते) यांना तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.
पुरुष अभिनय विभागात डॉ. सुदेश मनोहर मोरजकर यांना प्रथम पारितोषिक, पार्थ मंगेश वरेरकर यांना द्वितीय, तर दीपक किंजवडेकर, नारायण राऊळ, सोमदत्त ना. नाईक, वेदांत दर्शन नाईक, विश्वजीत परब, राज परब, नारायण भाटवडेकर यांना प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे.
स्त्री अभिनय विभागात चिन्मयी गोपाळ सावंत यांना प्रथम पारितोषिक, सिद्धी अंकुश नाईक यांना द्वितीय, तर दीपिका अ. नार्वेकर, डॉ. रोशनी तुळसकर, सिया नाईक, युक्ता देसाई, श्रृंगी मधुसूदन तारी, सायली नाईक, अंचिता परब मातोंडकर यांना प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. नेपथ्य विभागात चंद्रकांत परब यांना प्रथम पारितोषिक, तर प्रियदर्शन अ. साळगावकर यांना प्रशस्तीपत्र, प्रकाशयोजनेसाठी चैतन्य गिमोणकर यांना प्रथम पारितोषिक, नितिश नाईक यांना प्रशस्तीपत्र, वेशभूषेसाठी सावी नाईक यांना प्रथम पारितोषिक आणि समीक्षा सावंत यांना प्रशस्तीपत्र, ध्वनीसंकलन व पार्श्वसंगीतासाठी कौशल नारायण कवळेकर यांना प्रथम पारितोषिक, सागर गावस यांना प्रशस्तीपत्र, रंगभूषेसाठी उदयराज मोने यांना प्रथम पारितोषिक, तर जितेंद्र परब यांना प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे.

प्रसाद कळंगुटकर यांची लेखनासह दिग्दर्शनात छाप
उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळविलेल्या प्रसाद प्रेमानंद कळंगुटकर यांना नाट्यलेखन विभागात ‘प्रिजनर्स ऑफ वॉर’साठी प्रथम पारितोषिक मिळाले आहे. नाट्यलेखन द्वितीय तसेच अनुवादित किंवा रुपांतरित संहितेचे पारितोषिक देण्यात आलेले नाही.