९ वर्षांच्या श्रीशाने केली पोहून मांडवी नदी पार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
48 mins ago
९ वर्षांच्या श्रीशाने केली पोहून मांडवी नदी पार

हळदोणा: गोव्यातील (Goa) पोडवाल, कोर्जुवे येथील ९ वर्षांच्या श्रीशा पोळे या चिमुकलीने पोहून मांडवी नदी (Mandovi River)  यशस्वीपणे पार केली. त्यामुळे तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

शिक्षा निकेतन शाळेची (Shiksha Niketan School)  विद्यार्थिनी (student) असलेल्या श्रीशाची इतक्या लहान वयात मांडवी नदी पार करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी तिने वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी दुसरी इयत्तेत असताना प्रथम मांडवी नदी पार केली होती. तिचे धाडस, जिद्द आणि उत्कृष्ट पोहण्याच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे श्रीशाने कोणतेही खासगी प्रशिक्षण न घेता आपल्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्विमिंग कॅम्प’मधूनच पोहण्याचे कौशल्य विकसित केले. या कॅम्पमुळेच तिच्या मनात पोहण्याबद्दलची आवड आणि आत्मविश्वास वाढला.

या नदी पार करण्याच्या उपक्रमात एकूण ३२ जलतरणपटूंनी सहभाग घेतला. प्रशिक्षक अजय नाईक आणि त्यांच्या सहकारी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरक्षितरीत्या पार पडला.

श्रीशाच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह कोर्जुवे व हळदोणा परिसरात आनंदाचे वातावरण आहे. ती सुवर्णसिंह पोळे आणि राखी यांची कन्या असून, मुलीच्या आवडीला प्रोत्साहन देत तिला साथ दिल्याबद्दल पालकांचेही कौतुक होत आहे.