देशविघातक कारवायांसाठी हा पैसा वापरात आणला जाणार होता अशी माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद : गुजरातमधील महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) संयुक्त कारवाईत मोठा खुलासा झाला आहे. अहमदाबादमधील एका फ्लॅटवर छापा टाकून ८७.९ किलो सोने, ११ महागड्या घड्याळं आणि कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढी मोठी रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याची मशीन मागवावी लागली. या संपत्तीचा मालक कोण? याचा तपास सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर अधिकाऱ्यांनी अहमदाबादच्या पालडी भागातील एका फ्लॅटवर छापा टाकला. मात्र, त्यावेळी फ्लॅटला कुलूप होते. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी शाह यांच्या एका नातेवाईकांकडून चावी घेतली आणि फ्लॅट उघडला. अधिकाऱ्यांना या बंद खोलीमध्ये ८७.९२ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा सापडल्या. या सोन्याची किंमत ८० कोटी रुपये इतकी आहे. यापैकी बहुतांश सोन्याच्या विटांवर परदेशातील मार्किंग दिसून येत आहेत. यावरुनच हे सोनं तस्करीच्या माध्यमातून देशात आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थमंत्रालयाने या साऱ्या प्रकारासंदर्भात एक पत्रक जारी करत माहिती दिली आहे.
या छापेमारीदरम्यान ११ महागडी घड्याळंही सापडली आहेत. यामध्ये हिरे जडीत 'पाटे फिलिप' कंपनीच्या घड्याळाबरोबरच जॅकोब अॅण्ड कंपनी टाइमपीस, फ्रँक मुलर या कंपन्यांची घड्याळं आहेत. सोन्याच्या विटांबरोबरच सोन्याचे दागिनेही सापडले असून या दागिन्यांचं वजन १९.६६ किलोग्राम इतके आहे. या दागिन्यांमध्ये महागडे हिरे वापरण्यात आल्याचे दिसत आहे. या दागिन्यांचं मूल्य किती आहे याची चापणी सुरु आहे. या घरातील छापेमारीत १ कोटी ३७ लाख रुपयांची रोख रक्कमही सापडली आहे. सदर छापेमारी ही आर्थिक गुन्हेगारी, फेरफार याविरोधात डीआरआयच्या कारवाईचा एक भाग असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
ही संपत्ती नेमकी कोणाची आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. छापेमारी झालेला फ्लॅट मेघ शाह यांनी भाड्याने घेतला होता. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय दुबईत असून ते शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करतात. हे आर्थिक व्यवहार शेल कंपन्यांच्या माध्यमातून केले गेले असावे असा कयास पोलिसांनी वर्तवला आहे. देशविघातक कारवायांसाठी हा पैसा वापरात आणला जाणार होता अशी माहिती समोर आली आहे.
६ कोटी २८ रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली दुबईहून मुंबईला प्रवास करणाऱ्या तीन इराणी नागरिकांना अटक करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी बुधवारी सिंडिकेटच्या चौथ्या सदस्याला अटक केली. या सिंडिकेट सदस्यांनी यापूर्वी भारतात २८ कोटी रुपयांच्या किमान ४० किलो सोन्याची तस्करी केली होती. डीआरआयच्या चौकशीत असे दिसून आले आहे की
याच प्रमाणे बंगळुरू येथील येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर घाना येथील एका महिलेकडून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) कर्मचाऱ्यांनी ३८.४ कोटी रुपयांचे सुमारे ३.१८६ किलो कोकेन जप्त केले. अटक करण्यात आलेली घानाची नागरिक जेनिफर आबे बुधवारी कतारमधील दोहा येथून बेंगळुरूला आली. एका गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. झडती दरम्यान, तिच्याकडे अमलीपदार्थ आढळून आला.आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा शोध घेण्यासाठी अधिक चौकशीसाठी सदर महिलेला अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी, बंगळुरूमध्ये दोन दक्षिण आफ्रिकन नागरिकांना एमडीएमएची तस्करी आणि पुरवठा केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे असलेले २७५ कोटी रुपये किमतीचे ३७.८७ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.