पंखा चालू करण्यासाठी बटन दाबताच बसला विजेचा धक्का

ताळगाव येथे २३ वर्षीय कामगाराचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th March, 12:17 am
पंखा चालू करण्यासाठी बटन दाबताच बसला विजेचा धक्का

पणजी : ताळगाव-पणजी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राजीव सहानी (२३, हरयाणा) या कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या प्रकरणी पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करुन तपास सुरू केला आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताळगाव येथील बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावर विश्रांती घेण्यासाठी रविवारी पहाटे पाच वाजता गेलेल्या राजीव सहानी याने पंखा चालू करण्यासाठी बटन दाबताच त्याला विजेचा धक्का बसला. याची माहिती इतर कामगारांना मिळल्यानंतर त्याला लगेच बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. तिथे पोहचण्यापूर्वी त्याचा वाटेतच मृत्यू झाला. शवचिकित्सा करण्यात आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.

याची माहिती मिळताच पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश नाईक व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. 

हेही वाचा