साहित्य :
६ अंडी, दोन कांदे, १ टेबलस्पून खोबरे, २ टॉमॅटो, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला पावडर, तेल चार चमचे, कोथिंबीर.
वाटण मसाला :
१ कांदा चिरून थोड्या तेलावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.
१ टेबलस्पून सुके खोबरे गुलाबी रंगावर भाजावे व कांदा-खोबरे एकत्र बारीक वाटावे. त्यात थोडे लसूण, आलं आणि कोथिंबीर घालावी.
कृती :
६ अंडी उकडून घ्यावीत व सोलून एकेका अंड्याला सुरीने अर्धवट चार खाचा पाडाव्यात. कढईत तेल तापल्यावर १ कांदा बारीक चिरून घालावा व गुलाबी रंगावर परतवावा. नंतर त्यात टोमॅटो बारीक चिरून घालावा. नंतर त्यात लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला पावडर, कांदा - खोबऱ्याचे वाटण घालावे व सर्व ५ मिनिटं परतवावे. मिश्रण थंड झाल्यावर एकेका अंड्यात कापलेल्या भागातून अलगद आत भरावे. भरलेली अंडी उरलेल्या मिश्रणात घालून पुन्हा एक वाफ आणावी. वरून कोथिंबीर घालावी. गरम भाकरी किंवा चपाती सोबत ही डिश छान लागते .
कविता आमोणकर