पणजी महापालिका भाजप व बाबूशकडेच

पणजी : उत्सुकता लागून राहिलेल्या पणजी (Panjim) महापालिका (Muncipal Corporation) निवडणुकीची (Election) मतमोजणी श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे सुरू आहे. आता पर्यंत जाहीर झालेल्या निकालात भाजपचा पाठिंबा मिळालेले महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. निकाल जाहीर झालेल्या २१ उमेदवारांपैकी १९ उमेदवार बाबूश मॉन्सेरात पॅनलचे तर उत्पल पर्रीकर यांच्या ‘आमी पणजेकार’ पॅनलचे २ उमेदवार विजयी झाला आहेत.
विजयी उमेदवार बाबूश पॅनल
प्रभाग १ : युतिका जांबावलीकर
प्रभाग २ : कॅरोलिना पो
प्रभाग ३ : मार्गारिडा फर्नांडिस
प्रभाग ४ : रोहित मोन्सेरात
प्रभाग ५ : किशोर शास्त्री
प्रभाग ६ : बेंटो लॉरेना
प्रभाग ८ : करीना शिरोडकर
प्रभाग ९ : कबीर मखिजा
प्रभाग १०: प्रसाद आमोणकर
प्रभाग ११: तुकाराम चिन्ननावर
प्रभाग १२: वर्षा शेट्ये
प्रभाग १३: उदय मडकईकर
प्रभाग १४: प्रजोत वायंगणकर
प्रभाग १५ : शायनी चोपडेकर
प्रभाग १६ : अस्मिता केरकर
प्रभाग १८ : कृष्णा शिरोडकर
प्रभाग १९ : निकिता नाईक
प्रभाग २७ : विठ्ठल चोपडेकर
प्रभाग ३० : सिल्वेस्टर फर्नांडिस

उत्पल पर्रीकर पॅनल
विजयी उमेदवार
प्रभाग ७ : लियोनिड फुर्तादो
प्रभाग १७ : जॅक सुखीजा