एलपीजी सिलिंडर बुकिंग; ग्रामीण भागात ४५, शहरात २५ दिवसांची अट

मंत्री हरदीप सिंग पुरी यांची लोकसभेत माहिती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
54 mins ago
एलपीजी सिलिंडर बुकिंग; ग्रामीण भागात ४५, शहरात २५ दिवसांची अट

नवी दिल्ली : जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी (LPG) सिलिंडर बुकिंगसाठी किमान कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री (Union Minister for Petroleum and Natural Gas)  हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

नव्या नियमानुसार, शहरी भागात एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी किमान २५ दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे, तर ग्रामीण व दुर्गम भागात हे अंतर ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे. यापूर्वी ग्रामीण भागात २५ दिवस आणि शहरी भागात २१ दिवसांचे किमान अंतर होते.

मंत्री पुरी यांनी स्पष्ट केले की, वाढती मागणी आणि नव्या नियमानुसार, शहरी भागात एलपीजी सिलिंडर (LPG cylinders) बुकिंगसाठी किमान २५ दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे, तर ग्रामीण व दुर्गम भागात हे अंतर ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे. यापूर्वी ग्रामीण भागात २५ दिवस आणि शहरी भागात २१ दिवसांचे किमान अंतर होते.

मंत्री पुरी यांनी स्पष्ट केले की, वाढती मागणी आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन मागणी व्यवस्थापनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सिलिंडर बुकिंगपासून घरपोच वितरणापर्यंतचा सरासरी कालावधी २.५ दिवसांचा कायम ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझ (Strait of Hormuz) सामुद्रीधूनी या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर परिणाम झाला आहे. या मार्गातून जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजी वाहतूक होते. त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाल्याचे पुरी यांनी नमूद केले.

तथापि, भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे नमूद करीत त्यांनी सांगितले की, देशातील रिफायनऱ्या उच्च क्षमतेने कार्यरत असून, अनेक ठिकाणी त्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने उत्पादन करत आहेत. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, एटीएफ आणि एलपीजीचा पुरवठा सुरळीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय रुग्णालये व शैक्षणिक संस्थांना प्राधान्याने अखंड एलपीजी पुरवठा केला जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा