LIVE | पणजी महानगर पालिकेचे निकाल : पणजी महापालिका बाबूशकडेच!

प्रभाग ४ मधून रोहित मोन्सेरात विजयी. प्रभाग ९ मधून सुरेंद्र फुर्तादो पराभूत. प्रभाग १३ मधून उदय मडकईकर विजयी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
53 mins ago
LIVE | पणजी महानगर पालिकेचे निकाल : पणजी महापालिका बाबूशकडेच!

पणजी: पणजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीचा निकाल आज, १३ मार्च रोजी जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे मतमोजणीला सुरुवात झाली असून, त्यानंतर काही वेळातच अंतिम चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत ३० प्रभागांसाठी एकूण ६९ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असून ६९.०७ टक्के इतके मतदान झाले आहे.

ही निवडणूक प्रामुख्याने भाजप समर्थित मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे पॅनल आणि उत्पल पर्रीकर यांच्या 'आमी पणजेकार' पॅनलमध्ये चुरशीची झाली आहे. प्रभाग ४ मध्ये महापौर रोहित मोन्सेरात यांच्या विरोधात जॉन पो यांची थेट लढत असून, प्रभाग ६, ७, ९ आणि १० मधील लढतींकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. बाबूश मोन्सेरात आपले वर्चस्व टिकवून ठेवणार की उत्पल पर्रीकर यांचे पॅनल बाजी मारणार, याबाबत शहरात मोठी उत्सुकता आहे. प्रचारादरम्यान कॅसिनो, पार्किंग आणि शहराच्या विकासकामांचा मुद्दा कळीचा ठरला असून, आता पणजीतील मतदार कोणाच्या पारड्यात आपले माप टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

तिसरी फेरी : प्रभाग २० ते प्रभाग ३०ची मतमोजणी सुरू 


वेळ : ११.५६ 

  • प्रभाग ३० : बाबूश गटाचे सिल्वेस्टर फर्नांडिस विजयी.
  • प्रभाग २७ : बाबूश गटाचे विठ्ठल चोपडेकर विजयी.

दुसरी फेरी : प्रभाग ९ ते प्रभाग १९ची मतमोजणी सुरू

वेळ : ११.३५ 

उत्पल पर्रीकर यांच्या आमी पणजेकर गटाचे जॅक सुखीजा प्रभाग १७ मधून विजयी. आतापर्यंत पर्रीकर यांच्या गटाचे फक्त दोन उमेदवार विजयी

वेळ : ११.०० 

प्रभाग १४ : बाबूश गटाचे प्रजोत वायंगणकर विजयी

प्रभाग १८ : बाबूश गटाचे कृष्णा शिरोडकर विजयी

वेळ : १०.४५ 
प्रभाग १०ः बाबूश गटाचे प्रसाद आमोणकर विजयी
प्रभाग १५ः बाबूश गटाच्या शायनी चोपडेकर विजयी
प्रभाग १६ः बाबूश गटाच्या अस्मिता केरकर विजयी

वेळ १०.२४ 
प्रभाग ९ : कबीर मखिजा विजयी, सुरेंद्र फुर्तादो पराभूत.
प्रभाग १३ : उदय मडकईकर विजयी. 
प्रभाग १९ : निकिता नाईक विजयी
प्रभाग ११ : तुकाराम चिन्ननावर विजयी

पहिल्या ८ प्रभागांचे निकाल जाहीर. 

पहिल्या ८ प्रभागांच्या मतमोजणीत बाबूश मोन्सेरात गटाचे ७ उमेदवार विजयी, तर उत्पल पर्रीकर गटाचा १ उमेदवार विजयी.

प्रभाग १ (एसटी महिला) - 

युतिका जांबावलीकर - ३९६

रोशन मार्टिन्स - १०२

दामिनी कुंकळ्ळीकर - २४९

प्रभाग २ (ओबीसी महिला)

कॅरोलिना पो - ५५९

उमा वळवईकर - २०५

प्रभाग ३(ओबीसी महिला)

मार्गारिटा फर्नांडिस - ३३२

जेन पो - २८३

प्रभाग ४(खुला)

रोहित मोन्सेरात - ४०२

जॉन पो - १५८

अग्नेलो सिल्वेरा - १०४

प्रभाग ५(खुला)

किशोर शास्त्री - ४७२

सुदिन कामत - ४११

प्रभाग ६(ओबीसी)

बेंटो सिल्वेस्टर - ५००

डॉ.शीतल नाईक - ४०२

प्रभाग ७(खुला)

लियोनिड फुर्तादो - ४३४

संजीव देसाई - ३६६

प्रभाग ८(ओबीसी महिला)

करीना शिरोडकर - ५७०

शुभदा शिरगावकर - ३८५

वेळ ८.५६ : 

प्रभाग ६ : बेंटो लॉरेना विजयी. 

डॉ. शीतल नाईक पराभूत.

प्रभाग ५ :  किशोर शास्त्री विजयी.

प्रभाग १ : युतिका जांबावलीकर विजयी.

प्रभाग ३ : मार्गारिडा फर्नांडिस विजयी.

वेळ ८.५० : 

प्रभाग ४ : रोहित मोन्सेरात विजयी

प्रभाग  ७ : लियोनिड फुर्तादो विजयी

प्रभाग ८ : करीना शिरोडकर विजयी

प्रभाग २ : कॅरोलिना पो विजयी