स्त्रीच्या यशाचा मार्ग सोपा नाही. अनेक वेळा तिला सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. घरच्या जबाबदाऱ्या, कामाच्या ठिकाणी असलेला भेदभाव, इत्यादींमुळे स्त्रीला अनेक वेळा संघर्ष करावा लागतो. यासाठी समाजाने महिलांना समान संधी देणे आवश्यक आहे.
स्त्री ही समाजातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. आपल्या कुटुंबाची, समाजाची आणि राष्ट्राची प्रगती तिच्यावर अवलंबून असते. प्राचीन काळापासूनच स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा निर्माण करत आल्या आहेत. आजही स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य असते, त्यामुळे तिचे योगदान अनमोल आहे.
स्त्रीचे स्थान सुरुवातीला घराच्या चार भिंतीत मर्यादित होते. परंतु काळाच्या ओघात आणि सामाजिक वर्तनात झालेल्या बदलामुळे स्त्रीला विविध क्षेत्रांमध्ये स्थान मिळवता आले आहे. शिक्षण, व्यवसाय, कला, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रात स्त्रियांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. आजच्या महिलांना समाजात बिनधास्तपणे स्वतःचा आवाज ऐकवता येतो आणि त्यांनी यश संपादन केल्यामुळे ते दुसऱ्या स्त्रियांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत.
स्त्रीची शिक्षा खूप महत्त्वाची आहे. जर एका स्त्रीला योग्य शिक्षण मिळालं, तर ती फक्त स्वतःच्या जीवनातच सुधारणा करू शकते, परंतु ती तिच्या कुटुंबाला आणि समाजाला सुद्धा सुधारू शकते. समाजात सर्वांगीण विकास घडवण्याच्या दृष्टीने स्त्रियांचे शिक्षण आवश्यक आहे.
आजकाल, महिलांनाही पुरुषांप्रमाणे कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. महिलांनी आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली आहे, जसे की राजकारण, उद्योग, विज्ञान, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये. त्याचप्रमाणे महिलांनी त्यांच्या अधिकारांसाठी लढा दिला आणि स्वतःच्या हक्कांची ओळख निर्माण केली आहे.
परंतु, स्त्रीच्या यशाचा मार्ग सोपा नाही. अनेक वेळा तिला सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. घरच्या जबाबदाऱ्या, कामाच्या ठिकाणी असलेला भेदभाव, इत्यादींमुळे स्त्रीला अनेक वेळा संघर्ष करावा लागतो. यासाठी समाजाने महिलांना समान संधी देणे आवश्यक आहे.
आजच्या समाजात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ती घराची धुरा सांभाळत असताना, समाजाच्या विविध विकासात्मक कार्यातही सक्रिय सहभाग घेत आहे. म्हणूनच, महिलांना समान संधी मिळाव्यात आणि त्यांना समाजात आपले योगदान प्रभावीपणे देण्यासाठी पाठिंबा देणे आवश्यक आहे.
स्त्रीला सशक्त करण्याचे कार्य समाजाला एकत्रितपणे करावे लागेल, ज्यामुळे महिलांचे स्थान उंचावेल आणि समाज अधिक समृद्ध होईल.
मौस्मि कारापूरकर
देऊळवाडा, धारगळ-पेडणे