साडेसात लाखांचा दंड : २०१८ मध्ये घडली काणकोण तालुक्यात घटना
पणजी : काणकोण तालुक्यात २०१८ मध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या परिसरात मिठाई देण्याच्या आमिषाने एका ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी बाल न्यायालयाने आरोपी जयदीप रई आणि रवी रई या दोघांना २० वर्षे सश्रम कारावास आणि ७.५ लाख रुपयांचा दंड, तर तिसरा आरोपी मनोज कुमार याला २० वर्षे कैद व ७ लाख दंड अशी शिक्षा ठोठावली. याबाबतचा निवाडा बाल न्यायालयाचे अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला आहे.