२०११च्या जनगणनेसुनार आर्थिक सर्वेक्षण अहवालातील माहिती
पणजी : २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार गोव्यात साक्षरतेचे प्रमाण ८८.७ टक्के आहे. देशाच्या साक्षरतेचे प्रमाण ७३ टक्के आहे. देशाच्या तुलनेत गोव्यातील साक्षरतेचे प्रमाण बरेच जास्त आहे. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला. आर्थिक सर्वेक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. शेजारील महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण ८२.३ टक्के आहे तर कर्नाटकात ते ७५.४ टक्के आहे.
दर दहा वर्षांनंतर गोव्याच्या साक्षरतेचे प्रमाण वाढतच गेले. १९५१साली गोव्याच्या साक्षरतेचे प्रमाण २३.५ टक्के होते. यानंतर १९६१ साली ३५.४ टक्के, १९७१ साली ५२ टक्के, १९८१ साली ६५.७ टक्के, १९९१ साली ७५.५ टक्के, २००१ साली ८२ टक्के तर २०११ साली ८८.७ टक्के झाले. राज्याच्या साक्षरतेच्या प्रमाणात दशकागणीक वाढ होत गेलेली आहे.