गोवा : आता 'मुंबई टू गोवा' प्रवास करता येईल फक्त ६ तासांत

महामार्गाचे काम मे-जून पर्यंत पूर्णत्वास नेण्याचा मानस

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा : आता 'मुंबई टू गोवा' प्रवास करता येईल फक्त ६  तासांत

मुंबई : 'मुंबई टू गोवा' या बहुप्रतीक्षित ४६६ किमी चौपदरी महामार्ग प्रकल्पाचे काम हे येत्या मे-जून पर्यंत पूर्ण होईल.  यामुळे प्रवासाचा वेळ हा १२ तासांवरून अवघ्या ६ तासांपर्यंत येईल. माणगाव, इंदापूर, पाली, लांजा, कोलाड आणि चिपळूण या शहरातील काही बायपास, अंडरपास आणि उड्डाणपुलांचे काम प्रलंबित आहे.  



Mumbai to Goa in less than five hours? New highway to be ready by 2024:  Gadkari | HT Auto


मुळात हा प्रकल्प जेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजूर केला होता तेव्हा याचा प्रस्तावित खर्च हा ३,५०० कोटी रुपये इतका होता. जमीन संपादन आणि विविध तांत्रिक कारणांमुळे झालेल्या विलंबामुळे, प्रकल्पाची किंमत आता ७,३०० कोटी रुपयांवर गेली आहे.

Mumbai to Goa Road Trip: Your Guide to Routes, Pit Stops & Adventures -  StayVista Journal

८४ किमी अंतरचा पनवेल-इंदापूर हा मार्ग  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे बांधण्यात येत आहे तर उर्वरित भाग हा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. दरम्यान, माणगाव, इंदापूर, पाली, लांजा, कोलाड आणि चिपळूण येथील प्रलंबित काम हे मान्सूनच्या आधी  पूर्ण व्हावे यासाठी आपण प्रयत्नरत आहोत असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एक वरिष्ठ अभियंते म्हणाले.  


New Mumbai-Goa Marine Superhighway: Key details about the ₹26,000 crore  project

बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा