गोवाः सीबीटी गुणांविषयी तक्रार दाखल करण्यासाठी ३ फेब्रुवारीपर्यंत मुदत

उमेदवारांचे निकाल आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
गोवाः सीबीटी गुणांविषयी तक्रार दाखल करण्यासाठी ३ फेब्रुवारीपर्यंत मुदत

पणजी: एलडीसी पदांसाठीच्या सीबीटी-२ परीक्षेतील गुणांविरुद्ध उमेदवारांना ३ फेब्रुवारी पर्यंत तक्रार दाखल करण्याची मुदत आहे. आयोगाने तक्रार अर्ज भरून आयोगाच्या कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारी [email protected] या ईमेलवर पाठवता येतील. 

कर्मचारी भरती आयोगाने एलडीसी भरतीसाठी घेतलेल्या सीबीटी परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांचे निकाल आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अर्ज केलेल्यांपैकी ८५ टक्के उमेदवार परीक्षेला बसले, अशी माहिती सचिव शशांक ठाकूर यांनी दिली. 

एलडीसीमध्ये २३२ पदांसाठी २२,०४५ अर्ज आले होते. त्यापैकी १८७१८ उमेदवार परीक्षेला बसले होते. हे प्रमाण ८५ टक्के आहे. ३३२७ उमेदवारांनी परीक्षेला गैरहजर राहिले. उमेदवाराच्या लॉगिन आयडीवर प्रश्नावली पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना त्यांनी दिलेली उत्तरे बरोबर आहे की चूक हे पाहता येईल. कोणत्या प्रश्नांना गुण मिळाले आणि कोणत्या प्रश्नांला मिळाले नाहीत हे उमेदवाराला समजणार आहे.

तक्रारींवर तज्ज्ञ समिती निर्णय घेईल. तक्रारींवर निर्णय झाल्यानंतर, अंतिम निकाल जाहीर केला जाईल आणि पुढील परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. ११ जानेवारी, १२ जानेवारी, १८ जानेवारी, १९ जानेवारी आणि २५ जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती.

पाच केंद्रांवर झाली परीक्षा
ही परीक्षा आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आसगाव), सेंट झेवियर (म्हापसा), डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (फातोर्डा), रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स (नावेली), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कुंकळ्ळी) अशा पाच केंद्रांवर घेण्यात आली. 

ही परीक्षा चार बॅचमध्ये घेण्यात आली, पहिली बॅच सकाळी ९.१५ ते १०.३०, त्यानंतर दुसरी बॅच सकाळी ११.३० ते दुपारी १२.४५, तिसरी बॅच दुपारी २ ते ३.१५ आणि चौथी बॅच सायंकाळी ४.१५ ते ५.३०. यावेळेत झाली.

हेही वाचा