बार्देश : बादे-आसगाव येथे रॉटविलर कुत्र्याच्या हल्ल्यात युवक जखमी

कुटुंबियांकडून कुत्र्याच्या मालकाविरुद्ध हणजूण पोलिसांत तक्रार. गुन्हा नोंद.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th January, 09:57 am
बार्देश : बादे-आसगाव येथे रॉटविलर कुत्र्याच्या हल्ल्यात युवक जखमी

पणजी : बादे-आसगाव येथे रॉटविलर कुत्र्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विनिल साळगावकर हा युवक जखमी झाला असून याबाबत त्याच्या भावाने पोलिसांत कुत्र्याच्या मालकाविरोधात तक्रात नोंदवली आहे. कुत्र्याला ताब्यात ठेवण्यासाठी त्याच्या मालकाने कोणत्याही उपाय योजना केल्या नाहीत असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.




या प्रकरणी हाती आलेल्या प्राथमिक महितीनुसार, काल बुधवार २९ जानेवारी रात्री १०.१५ वाजता सदर घटना घडली. बादे- आसगाव येथील एका घरातील कुत्र्याने विनिल यांच्या पायाचा चावा घेतला. यानंतर विनिल यास तत्काळ शिवोली येथील आरोग्य केंद्रात नेत त्याचावर उपचार करण्यात आले. दरम्यान सदर कुत्र्याने यापूर्वी विनिल याच्या बहीणीवर देखील हल्ला केला होता. तेव्हा शेजारधर्म पाळत कुत्र्याच्या मालकाविरोधात कोणतीही तक्रार नोंदवली नाही. पण कालच्या घटनेनंतर ती करणे भाग पडले आहे असेही विनिलच्या भावाने म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी  शाम गोवेकर (बादे-आसगाव) याच्यावर  भारतीय न्याय संहितेच्या कलम २१९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 


कुत्र्यांच्या मालकांवरही निर्बंध हवे


रॉटविलर ही प्रजाती त्याच्या हिंसक स्वभावासाठी ओळखली जाते. हणजुण येथेच २९ ऑगस्ट २०२४ रोजी घडलेल्या दुर्घटनेत एका लहान मुलाचा बळी गेल्यानंतर अशा कुत्र्यांचा एकंदरीत वावरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ‘कुत्रे पाळण्याची हौस एखाद्या गरीब व्यक्तीचा जीव घेऊ शकते,’ असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. यानंतर गोवा सरकारने  रॉटविलर आणि तत्सम हिंस्र कुत्र्यांच्या प्रजातींवर बंदी घातली होती. याविषयी पशू संवर्धन खात्याने याबाबत अनेक नियम देखील जारी केले होते. 


Tender_Medicine 5.75.cr



कुत्र्याचे नाव, जन्म, जात, लिंग तसेच इतर माहितीसह खात्याला द्यावी लागेल. तसेच एक व्यक्ती जर कुत्रा पाळत असेल आणि त्या कुत्र्यामुळे इतर व्यक्ती किंवा प्राण्यांना इजा किंवा धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्या मालकाची असेल, असे प्रतिज्ञापत्र पशुसंवर्धन खात्याला द्यावे लागेल, अशी अधिसूचना पशुसंवर्धन खात्याद्वारे काढण्यात आली होती. मालकाने कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास त्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल असेही त्यात म्हटले होते. 


More street dog rules, more dog attacks and deaths also - Civil Society  Magazine


केंद्र सरकारनेही मार्च २०२४ मध्ये राज्यांना २३ जातीच्या कुत्र्यांच्या आयातीवर बंदी घालण्यास सांगितले होते.दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला सर्व पक्षांशी सल्लामसलत केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत याप्रकरणी निर्णय घेण्याचे आदेश दिले होते . यानंतर केंद्राने राज्यांना प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक नियम २०१७-१८ कठोरपणे लागू करण्यास सांगितले. कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे मानवी मृत्यूच्या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्राने राज्यांना या २३ जातींच्या कुत्र्यांची केवळ आयातच थांबवू नये तर त्यांची पैदास आणि विक्रीवर बंदी घालण्यास सांगितले आहे. या यादीत रॉटविलर आणि पिटबुल यांचाही समावेश आहे. 


ये है दुनिया के सबसे खतरनाक कुत्तों में से एक Rottweiler, शरीर देखकर आप भी  बोल पड़ेंगे- 'ओह माय गॉड' | rottweiler dog breed is one of the most  dangerous dogs breed


बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा