असंंतुष्ट लोकांकडून आमदार लक्ष्य : राजकारण करणे चुकीचे
पणजी : आमठाणे धरणातून ताशी ३६७० क्युबिक मीटर पाणी सोडण्यात आल्याने पर्वरीतील पाण्याची समस्या आता दूर होणार आहे. शिवाय पाण्याची टंंचाई दूर करण्यासाठी दिवसाला १० ते १२ टँकर्स उपलब्ध करण्यात आले आहेत. मतदारसंंघातील काही असंंतुष्ट लोक पाणी प्रश्नावर राजकारण करून आमदाराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होते, असे पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंंत्री रोहन खंंवटे यांंनी म्हटले आहे.
पर्वरीत कोणालाच पाण्याची समस्या जाणवू नये, म्हणून हेल्पलाईन नंंबर देण्यात आला होता. स्वत: मी व माझी टीम पाणीपुरवठा करण्यासाठी झटत होताे. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पाण्याच्या स्थितीवर सर्वांंचे लक्ष होते.
कुठेही पाण्याची टंंचाई जाणवली, तर टँकरची व्यवस्था करण्यात येत होती. सार्वजनिक बांंधकाम खात्यातर्फे मोफत टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यामुळे कोणाचेही पाण्यावाचून अडले नाही, असे पर्यटनमंंत्री रोहन खंंवटे म्हणाले.
पर्वरी हा परिसर जलवाहिनीच्या एकदम शेवटी असल्याने काही वेळा पाण्याची समस्या निर्माण होते. तिळारी धरणाचे पाणी बंंद झाले की, आवश्यक ती व्यवस्था करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांंधकाम व जलस्रोत खात्याची आहे.
पर्वरीत पाण्याची पर्यायी व्यवस्था या दाेन खात्यांच्या अभियंंत्यांंनी करायला हवी. अशा स्थितीत पूर्वीच्या अनुभवातून त्यांंनी योग्य तो निर्णय घ्यायला हवा. आमदार वा मंंत्र्यांवर हस्तक्षेप करण्याची वेळ येता कामा नये, असा इशारा खंवटे यांंनी अभियंत्यांना दिला आहे.
सातव्या दिवशीही पाणी टंचाई !
तिळारी कालवा फुटल्यानंतर पर्वरी मतदारसंघात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. येथील स्थानिकांना पाणी पुरवण्यासाठी आमठाणे धरणातून पाणी सोडण्यात आले, मात्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा सदोष असल्याने पर्वरी मतदारसंघात सातव्या दिवशीही पाण्याची समस्या जैसे थे आहे. समस्येचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच पाणी वितरण अडथळ्यातील दोष शोधून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक आमदार तथा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
उपाय शोधणे आवश्यक होते !
तिळारीचे पाणी बंंद झाल्यानंंतर पर्वरी मतदारसंंघात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याची टंंचाई भासली नाही. तरीही स्वत:च्या जीवनात अयशस्वी असलेल्या लोकांंनी पाणीटंंचाईच्या आधारे आमदाराला लक्ष्य केले. या लोकांंबद्दल मला काहीच बोलायचे नाही. पाणीटंंचाईवर उपाय शोधण्याऐवजी त्यांंनी राजकारण केले. ज्यांंना मार्ग काढायचा होता, त्यांनी पाणीटंंचाईवर उपाय काढलाः रोहन खंंवटे, पर्यटनमंंत्री