१ बोट तसेच ५ क्यूबिक मीटर रेती मिळून १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पणजी : पणजी किनारी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे २९ जानेवारीच्या रात्री धडक मोहीम राबवत मांडवी नदीपत्रात सुरू असलेल्या बेकायदा रेती उपशाच्या ठिकाणी कारवाई केली. यात रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेली १ बोट तसेच ५ क्यूबिक मीटर रेती मिळून १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या ३०३(२),३(५) तसेच खाण आणि खनिज (विकास नियमन) कायदा आणि गोवा दमण आणि दीव गौण खनिज सवलत नियम १९८५ चा ६२ (२) अन्वये पणजी किनारी पोलिसांनी १२ संशयितांसह समीर मोंडल (३०, पश्चिम बंगाल) यास अटक केली आहे. याप्रकरणी पणजी किनारी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अजित उमर्ये यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस पथकाने कामगिरी बजावली. पुढील तपास सुरू आहे.