पणजी : मेळावली-सत्तरी आयआयटी आंदोलनात भाग घेतलेल्या एका काँग्रेस नेत्यासह चार जणांना सत्तरी-वाळपई दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले आहे. हुतात्मा दिनी जारी केलेले समन्स मी अभिमानाने स्वीकारले आहे, असे काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.
मेळावली आयटीआय प्रकल्पाविरुद्धच्या आंदोलनात स्थानिकांना पाठिंबा देणारे शैलेंद्र वेलिंगकर, डायना तावारेस, सचिन भगत, सुनील सांतइनेसकर आणि अमरनाथ पणजीकर यांना सत्तरी-वाळपई दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले आहे. शुक्रवारी दुपारी २.३० वाजता सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम १९४ अंतर्गत हे समन्स जारी करण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले की, हुतात्मा दिनी जारी केलेले समन्स अभिमानाने स्वीकारले आहे. मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा खरा सैनिक आहे. या पक्षाचे महात्मा गांधी आणि इतर महान नेते सामान्य लोकांसाठी लढले आहेत, असे पणजीकर यांनी सांगितले.