अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी एकास तामिळनाडूतून घेतले ताब्यात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th January, 04:30 pm
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी एकास तामिळनाडूतून घेतले ताब्यात

डिचोली :  येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी तामिळनाडू येथून एकास ताब्यात घेतले. गोव्यात आणून त्यास अटक केली तर अल्पवयीन १७ वर्षीय मुलीला अपना घरात पाठवण्यात आले. 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मुलीच्या वडिलांनी मे २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. संशयित नवीनकुमार गौंडर (मूळ तामिळनाडू) याने त्यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी प्रकरण नोंदवले.  सदर अल्पवयीन मुलगी व संशयिताचा शोध घेण्यासाठी डिचोली पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक जयप्रकाश जानकर, कॉन्स्टेबल मयूर आसुलकर आणि महिला कॉन्स्टेबल अश्विनी गावकर यांचे पथक स्थापन करण्यात आले.  

अद्ययावत यंत्रणा आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर सदर अल्पवयीन मुलीचा शोध लावला. संशयित नवीनकुमार मणी गौंडर (२६, तिरुचेंगोडे, तामिळनाडू) व त्याच्यासोबत असलेल्या मुलीला ताब्यात घेत त्यांना गोव्यात आणले गेले. संशयित गौंडरवर आयपीसीचे कलम ३६३, गोवा बाल कायद्याचे कलम ८, भा. न्या. संचे कलम ६४(२)(i) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा नोंदवत त्यास अटक करण्यात आली. यांतर एनजीओसमोर सादर करून जबाब नोंदवल्यानंतर आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीची अपना घरमध्ये रवानगी करण्यात आली. 

याप्रकरणी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला  कॉन्स्टेबल सोनाली हरमलकर व पोलीस पुढील तपास करत आहेत. 


हेही वाचा