कोविडच्या मंदीतून सावरत पूर्वपदावर येणाऱ्या नाईटलाईफ आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला मिळणार बूस्टर डोस
पणजी : गेल्या अनेक वर्षांपासून 'मोस्ट हॅपनिंग नाईटक्लब ऑफ गोवा' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या गोव्यातील 'टिटोज' क्लब आता एसएमई आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, १००० कोटींचे मूल्यांकनाचे लक्ष्य ठेवून 'टिटोज'चे मालक डेव्हिड आणि रिचर्ड डिसोझा रोडमॅपवर काम करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आयसीआयसीआय सिक्युरिटीजला लीड बँकर म्हणून पसंती देण्यात आली आहे.
सदर आयपीओ हा ३० टक्के इक्विटी डायल्यूशनसह लाँच केला जाईल. सर्व शेअर्स हे नव्याने इश्यू केले जातील मात्र ओएफएसबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. टिटोजचा आयपीओ हा कोविडनंतर पूर्वपदावर येणाऱ्या नाईटलाईफ आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी बूस्टर डोसचे काम करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष माहितीनुसार, गोव्यातीलच एका उद्योगपतींसोबत प्री-आयपीओ इक्विटी अलॉटमेंटसाठी चर्चा केली जात आहे. सर्वकाही सुरळीत झाल्यास टिटोजचे मूल्यांकन अजून वाढू शकते.
बातमी अपडेट होत आहे.