मुंबई : मॅट्रिमोनियल साईटवरून तब्बल महिलांची फसवणूक; एक कोटीहून अधिक रुपये उकळले

पोलिसांनी आरोपीला लखनौ येथून अटक केली. आरोपी बनावट कॉल सेंटर चालवायचा तसेच भोजपुरी आणि हिंदी थर्ड ग्रेड चित्रपटही बनवायचा .

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th January, 02:45 pm
मुंबई : मॅट्रिमोनियल साईटवरून तब्बल महिलांची फसवणूक; एक कोटीहून अधिक रुपये उकळले

ठाणे  : ठाणे  जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हिंदी आणि भोजपुरी चित्रपटही बनवायकहा. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. बनावट कॉल सेंटर चालवणे आणि महिलांची फसवणूक करण्यासाठी मॅट्रिमोनियल साईटवर बनावट मॅट्रिमोनिअल प्रोफाइल तयार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ३० महिला याच्या बळी ठरल्या असून, त्यांच्याकडून या ठकसेनाने अंदाजे १ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याशिवाय, चॅटिंग वेबसाइटसाठी वापरलेले ९ लॅपटॉप आणि राउटर मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून महिलांना फसवणाऱ्या एका आरोपीला भोपाळ येथून अटक केली होती. त्याने महिलेची १३ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली होती. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिषही दाखवले होते. मात्र, अटकेनंतर पोलिसांनी कडक चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आणला. यानंतर पोलिसांनी छापा टाकून दुसऱ्या आरोपीलाही अटक केली. दुसरा आरोपी हिंदी आणि भोजपुरी भाषेत छोटे-छोटे थर्ड ग्रेड व्हिडिओ  बनवत असे. याशिवाय तो महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूकही करायचा. 

दरम्यान हाती आलेल्या माहितीच्या आधारे, मुंब्रा पोलिस ठाण्याचे सायबर सेलचे अधिकारी प्रवीण सुरवाडे आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा सातत्याने तपास करत होते. हे लोक महिलांना लग्नाचे आमिष देऊन ऑनलाइन फसवायचे. यावेळी भोपाळ येथून एका आरोपीला अटक केल्यानंतर त्याने मुख्य सूत्रधार इजाज अहमद इम्तियाज (३२) याची माहिती दिली. दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अटक करण्यात आली. लखनौ मध्ये १२०० स्क्वेअर फूट पसरलेल्या एका खोलीत त्याने एका वेबसाईटच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ आणि चॅटसाठी प्लॅटफॉर्म तयार केला होता. आरोपी एजाज अहमद इम्तियाजला २२  जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा