नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर : सोनसडोतील कचऱ्याासाठी श्रेडींग मशीन
मडगाव नगराध्यक्षांच्या नव्या गाडीचा शुभारंभ करताना आमदार दिगंबर कामत. (संतोष मिरजकर)
मडगाव : मडगाव पालिका क्षेत्रातील ओल्या कचर्याचा प्रश्न बहुतांश सुटलेला आहे. पण सुका कचर्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे सुका कचरा टाकण्यासाठी चार ते पाच ठिकाणी जागांचा शोध घेण्यात येत आहे. याशिवाय वाहनावर बसवलेली श्रेडींग मशिन घेण्याचाही विचार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.
मडगाव नगराध्यक्षांसाठी नवी कार घेण्यात आली असून आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. मडगाव नगराध्यक्षांची गाडी काहीवेळा वाटेतच बंद पडण्याच्या घटना घडल्यानंतर मडगाव नगराध्यक्षांसाठी नवी गाडी घेण्यात आली आहे. पालिका मंडळाने ठरवल्याप्रमाणे पालिका इमारतीला लाल व पांढरा रंग देण्यात येत आहे. पालिका मंडळाचा निर्णयाला कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही. सोनसडो येथील कचऱ्यासाठी श्रेडींग मशिन रेडीमेड कंपनीकडून घेतली नसून प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिका अभियंता यांनी बेळगावात जाऊन ती तयार करून घेतलेली आहे. या मशिन सतत सुरू राहिल्याने काहीवेळा नादुरुस्त होतात. त्यासाठी सदर मशिन तयार करणाऱ्यांना कळवून ते दुरुस्त करणार आहेत. दरम्यान, कचरा टाकण्यासाठी आणखी कुठे जागा मिळते का याची शहानिशा केली जात आहे, अशी माहितीही आमदार दिगंबर कामत यांनी दिली.
मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की, मडगाव नगरपालिका मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पालिका इमारतीला इमारतीच्या बांधकामानंतर देण्यात आलेला लाल व सफेद रंग पुन्हा देण्यात येत आहे. चांगल्याप्रतीचा रंग वापरण्यात यावा यासाठी काही कंपन्यांच्या रंगांची पाहणी व इतर गोष्टी तपासण्यात आल्या. त्यानंतर आता अल्टीमा कंपनीचा रंग वापरला जात आहे. ठेकेदाराला लवकरात लवकर रंगकाम पूर्ण करण्यास सांगण्यात आलेले आहे.
सुक्या कचर्यामुळे समस्या गंभीर
- कचर्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिका मंडळ व अभियंता कार्यरत आहेत. मोठ्या प्रमाणात येणार्या सुक्या कचर्यामुळे गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे माडाची झावळे, करवंट्या व इतर कचर्याची पावडर करणारी नवी श्रेडींग मशिन घेण्याचा प्रयत्न आहे.
- पालिका प्रशासनाकडून रात्रीच्या वेळेला कचरा टाकणार्यांवर आळा आणण्यासाठी दरदिवसासाठी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. मागील आठवड्याभरात ३४ प्रकरणे नोंद करण्यात आली व सुमारे ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.