पेडण्यात कोणीही येवो, माझे काम सुरूच : प्रवीण आर्लेकर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
पेडण्यात कोणीही येवो, माझे काम सुरूच : प्रवीण आर्लेकर

पणजी : विधानसभा निवडणूक २०२७ मध्ये पेडण्यात बाबू आजगावकर किंवा अन्य कुणीही येवो. यामुळे माझ्या कामावर फरक पडत नाही. तिथे माझे काम सुरूच आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली. आर्लेकर यांनी सोमवारी लोकोत्सवातील स्टॉलला भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. दरम्यान, माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी २०२७ मध्ये पेडण्यातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.
रविवारी बाबू आजगावकर यांनी आपण २०२७ मध्ये पेडण्यातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. यावर आमदार आर्लेकर यांनी प्रतिक्रिया दिली. आर्लेकर म्हणाले, की मी माझ्या मतदारसंघांत काम करत आहे. त्यामुळे तिथून कुणीही निवडणूक लढवली तरी मला फरक पडणार नाही. तिथे माझे काम चांगले सुरू असल्याने बाबू आजगावकरांसमोर माझेच आव्हान असणार आहे.
पेडणेवासीयांनी फेक मेजेसवर विश्वास ठेवू नये
तत्पूर्वी, बाबू आजगावकर म्हणाले होते की, २०२७ मध्ये मी १०० टक्के पेडण्यातून निवडणूक लढणार आहे. मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेतल्यामुळे काही लोक आताच गडबडून गेले आहेत. त्यामुळे असे लोक आजगावकर २०२७ मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे खोटे मेसेज प्रसारित करत आहेत. पेडण्यातील जनतेने अशा फेक मेजेसवर विश्वास ठेवू नये. मी २०२७ मध्ये पेडण्यातूनच निवडणूक लढवणार असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा