इराणच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
तेहरान : जगप्रसिद्ध पॉप गायक अमीर तातालू याला ईशनिंदेच्या गुन्ह्यासाठी इराणी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. आमिरवर पैगंबर मुहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. यासाठी इराणच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने त्याला ईशनिंदा आणि इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले होते आणि प्रथम त्याला ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, परंतु सरकारी वकिलांनी यावर आक्षेप घेतला आणि नंतर या प्रकरणात पुन्हा निकाल देताना आमिरला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
खटला पुन्हा उघडण्यात आला
इराण न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपी अमीर तातालू उर्फ अमीर हुसेन मगसूदलू याला यापूर्वी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण खटला पुन्हा उघडण्यात आला आणि त्याची चौकशी करण्यात आली आणि गायकावरील ईशनिंदेचा आरोप खरा असल्याचे सिद्ध झाले. यानंतर, अमीर तातालूला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पण न्यायालयाने असेही म्हटले आहे की हा अंतिम निर्णय नाही, जर त्याविरुद्ध अपील केले तर त्यावर पुनर्विचार करता येईल.
तातालू पोलिसांपासून लपून बसला होता
आमीर सध्या कोठडीत आहे, परंतु २०१८ मध्ये त्याला शिक्षा झाल्यापासून तो तुर्कीतील इस्तंबूलमध्ये लपून बसला होता. २०२३ मध्ये पोलिसांनी त्याला पकडले आणि इराणच्या स्वाधीन केले.