डिचोलीच्या नगराध्यक्षपदी विजयकुमार नाटेकर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडून अभिनंदन

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
डिचोलीच्या नगराध्यक्षपदी विजयकुमार नाटेकर

पणजी : डिचोली नगराध्यक्षपदी विजयकुमार नाटेकर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. साखळीतील रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

डिचोली पालिकेच्या रिक्त नगराध्यक्षपदासाठी बुधवारी (दि. २२) निवडणूक होणार असून, नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे डिचोलीवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. पुंडलिक (कुंदन) फळारी यांनी ७ रोजी दिलेला नगराध्यक्षपदाचा राजीनामा पालिका प्रशासन खात्याने मंजूर केल्यानंतर नगराध्यक्षपद रिक्त होते.

९ डिसेंबर रोजी डिचोलीच्या 'नवा सोमवार' उत्सवादिवशीच ९ जणांच्या गटाने कुंदन फळारी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर उपनगराध्यक्ष दीपा पळ, नगरसेवक अनिकेत चणेकर, नीलेश टोपले, सतीश गावकर, तनुजा गावकर, दीपा शिरगावकर, अॅड. रंजना वायंगणकर, अॅड. अपर्णा फोगेरी व गुंजन कोरगावकर या नऊ नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. आता विजयकुमार नाटेकर बिनविरोध निवड निश्चित झाल्याने डिचोलीला नवे नगराध्यक्ष मिळणार आहेत.

हेही वाचा