पेडणे : चांदेल हसापूर कासारवर्णे भागात गव्यांचे दर्शन ; शेतकरी-बागायतदार हवालदिल

भात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th January, 01:56 pm
पेडणे : चांदेल हसापूर कासारवर्णे भागात गव्यांचे दर्शन ; शेतकरी-बागायतदार हवालदिल

पेडणे : आज सकाळी पेडण्यात चांदेल हसापूर जंक्शनवर गव्याच्या कळपाचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे येथील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाले आहेत.  जंगली जनावरांसाठी जंगलच राहिले नाही. त्यामुळे ते लोकवस्त्यांत येतात. अन्नापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ते शेतात बागायतीत घुसून नासधूस करतात. सरकारने आणि संबंधितांनी यावर तोडगा काढावा असे मत येथील स्थानिक व शेतकरी उदय महाले यांनी केली.  गवे सध्या चांदेल, हळर्ण, हसापुर, कासारवर्णे भागात ठाण मांडून बसले आहेत. 

चांदेल हसापूर  या भागात सध्या गव्यांचा कळप मोठ्या प्रमाणात शेती बागायतीत येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याचे स्थानिकांच्या तक्रारी आहे. या गव्यांच्या कळपामुळे पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यावर आर्थिक ताण येत असल्याची माहिती शेतकरी उदय महाले यांनी दिली. हातातोंडाशी आलेले पीक गव्यांमुळे तसेच इतर जनावरांमुळे नष्ट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

रानटी जनावरांपासून शेती बागायतीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. त्यामुळे काही शेतकरी शेती बागायतीकडे वळणे ऐवजी शेती बागायती तशाच ठेवतात. कृषी खात्याने तसेच वन खात्याने याकडे लक्ष देऊन या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे येत आहे.