चोरीप्रकरणी एकास अटक
फोंडा : वरचा बाजार -फोंडा येथे गुरुवारी सकाळी फ्लॅटमध्ये घुसून महिलेचा विनयभंग व ८ हजार रुपये चोरी केल्याप्रकरणी गणाधीश देवानंद पेटकर (केरी - फोंडा) याला फोंडा पोलिसांनी अटक केली. घटनेवेळी संशयित दारुच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी फ्लॅटमध्ये अचानक संशयिताने घुसून ३६ वर्षीय महिलेचा विनयभंग केला. महिलेच्या फ्लॅटमध्ये असलेले आठ हजार रुपये चोरुन नेले. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला त्वरित अटक करण्यात आली आहे.