प्रयागराज: कुंभमेळा, अर्धकुंभाबाबत 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहित आहेत का?

२०१३ मध्ये प्रयागराजमध्ये शेवटचा महाकुंभ आयोजित करण्यात आला होता

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
14th January, 03:49 pm
प्रयागराज: कुंभमेळा, अर्धकुंभाबाबत 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहित आहेत का?

प्रयागराज: प्रयागराज येथे आज मंगळवारपासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. हिंदू धर्मात प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाला विशेष धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. भारतातील प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार या चार ठिकाणी महा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. 

प्रयागराजध्ये होणारा कुंभमेळ्याला 'महाकुंभ' असे म्हणतात, जे दर १२ वर्षांनी आयोजित केले जाते. प्रयागराजमध्ये शेवटचा महाकुंभ २०१३ मध्ये आयोजित करण्यात आला, त्यानंतर २०२५ मध्ये प्रयागराजमध्ये पुन्हा कुंभमेळा आयोजित आला आहे. 


कुंभमेळा म्हणजे...

संस्कृतमध्ये ‘कुंभ’ या शब्दाचा अर्थ घडा किंवा घट किंवा कलश, तर ‘मेळा’ या शब्दाचा अर्थ ‘यात्रा’ असा आहे. हिंदु संस्कृतीमध्ये कुंभ, घट किंवा कलश यांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. 


कुंभमेळा अशाप्रकारे ठरवला जातो -

कुंभ राशीत ‘गुरु’ असता हरिद्वारला, वृषभ राशीत गुरु असता प्रयागराजला, सिंह राशीत गुरु असता त्र्यंबकेश्वर येथे, तसेच गुरु सिंह राशीत; परंतु मेषेचा सूर्य, तुळेचा चंद्र आणि वैशाख पौर्णिमा असतांना उज्जैन येथे कुंभमेळा असतो

दर सहा वर्षांनी अर्धकुंभ -

हा कुंभमेळा १२ वर्षांच्या अंतराने साजरा केला जातो, यासाठी चारही ठिकाणे एक-एक करून निवडली जातात. या काळात भाविक गंगा, क्षिप्रा, गोदावरी संगमामध्ये स्नान करतात. दर सहा वर्षांनी अर्धकुंभ साजरा केला जातो. अर्धकुंभ फक्त दोन ठिकाणी म्हणजेच प्रयागराज आणि हरिद्वार येथे आयोजित केला जातो. 

हेही वाचा