पाळोळे येथे दोन दुकाने फोडली;लाख रुपये पळविले

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
4 hours ago
पाळोळे येथे दोन दुकाने फोडली;लाख रुपये पळविले

काणकोण : पाळोळे (Palolem) समुद्रकिना-याजवळील (Beach) दोन दुकाने फोडून चोरटयांनी सुमारे १ लाख रूपये रोकड़पळविली. एक डेंटल सिलिक  व एका जनरल स्टोअर्समध्ये ही चोरी करण्यात आली. पाळोळे येथे चोरांनी डेंटल क्लिनिकमध्ये (Dental clinic) प्रवेश करून रोख रक्कम आणि वैद्यकीय उपकरणे (medical instruments) लंपास केली. काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रोझमंड लुसियानो यांच्या डेंटल क्लिनिकमधील शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर चोरांनी दंत रोपण पेटी, अब्युटमेंट्स, बोन, ग्राफ्ट्स, कोलेजन मेम्ब्रेन, एक फिजिओ डिस्पेंसर, इम्प्लांट इन्स्ट्रुमेंट, एक एंडो मोटर आणि सुमारे २० हजार इतकी रोख रक्कम लंपास केली तर जनरल स्टोरमधील सुमारे ८० हजार रूपये चोरटयांनी पळविले. पोलिसांनी या घटनेनंतर फॉरेन्सिक टीमला तसेच श्वान पथकालाही पाचारण केले मात्र चोरटे सापडू शकले नाहीत.

हेही वाचा