काणकोणमध्ये गंज लागलेल्या बाटल्यांतून सोडा-शीतपेयांची विक्री

आरोग्यास धोकादायक

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
काणकोणमध्ये गंज लागलेल्या बाटल्यांतून सोडा-शीतपेयांची विक्री

पैंगीण : काणकोण येथील बहुतेक हॉटेल्स, बार व रेस्टॉरंटमध्ये (Hotel and Restaurant) गंज लागलेल्या बाटल्यांत सोडा, शीतपेये (Soft drink)  विकली जात आहेत. आरोग्याच्यादृष्टीने हे धोकादायक असून, यासंदर्भात काणकोण (Canacona)  येथील काही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. 

काणकोणात बहुतेक हॉटेल्स तसेच बार व रेस्टॉरंट मध्ये गंज लागलेल्या सोडाच्या व शीतपेयांच्या बाटल्या विकल्या जात आहेत ही चिंतेची बाब आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते धोकादायक असल्याचे श्रीस्थळ पंचायतचे उपसरपंच शिवराज देशमुख यांनी सांगितले.

काणकोणात बहुतेक हॉटेल्समध्ये सोडा आणि इतर शीतपेयांच्या बाटल्या ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही, परिणामी ते त्या रेस्टॉरंटच्या बाहेर मोकळ्या जागेत ठेवतात आणि पावसाचे पाणी आणि दव यामुळे बाटलीचे झाकण गंजते,  असे देशमुख म्हणाले.

 शीतपेयांच्या बाटल्या देखील जुन्या (outdated) आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या आरोग्य समस्येकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.

काणकोण सामुदायिक आरोग्य केंद्राच्या स्वच्छता निरीक्षकांनी गंजलेल्या कॅप बाटल्यांची तपासणी करावी व आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी उपसरपंच देशमुख व इतर काही प्रमुख नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा