कर्नाटक : भारतात आढळली ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस २ प्रकरणे; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

बंगळुरू येथील आठ महिन्यांच्या मुलाला तर अन्य कर्नाटकातीलच अन्य ठिकाणच्या तीन महिन्यांच्या मुलीला लागण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th January, 12:21 pm
कर्नाटक :  भारतात आढळली ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस २ प्रकरणे; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

बंगळुरू : चीनमध्ये पसरलेल्या कोरोनासारख्या विषाणूचे पहिले दोन रुग्ण भारतात आढळून आले आहेत. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) असे या विषाणूचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरूमध्ये ८ महिन्यांच्या मुलाची चाचणी तर कर्नाटकातीलच अन्य ठिकाणी ३ महिन्यांच्या मुलीची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बंगळुरू येथील बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये नमुन्याची चाचणी घेण्यात आली.  मात्र, त्यांच्या प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात आले नसल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले असून येथील आरोग्य यंत्रणा सध्या अलर्टवर आहे. 


First HMPV case in India: 8-month-old baby in Bengaluru suspected to be  infected

.

जेव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड-१९ सारखी लक्षणे दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. यापैकी २ वर्षांखालील मुलांना श्वसनाचा सर्वाधिक त्रास होतो असे आढळून आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एचएमपीव्हीशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.


India Reports First Case of HMPV Virus, 8-Month-Old Baby Tests Positive

 

केंद्राने ४ जानेवारी रोजी यासंदर्भात संयुक्त मॉनिटरिंग ग्रुपची एक बैठक घेतली होती. सर्दी आणि फ्लूचा हंगाम असल्याने सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे यावेळी सांगण्यात आले होते. खबरदारी म्हणून ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवण्याचे सरकारने यावेळी निर्देशही दिले होते. कोविड काळात आयसीएमआर आणि आयडीएसपीसारख्या संस्थांद्वारे कोरोनासह  इन्फ्लूएंझा आणि न्युमोनियासारख्या आजारांना रोखण्यासाठी अनेक प्रणाली अस्तित्त्वात आणल्या होत्या. याच प्रणाली आता  ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसच्या अनुषंगाने अपडेट केल्या जातील. 


India's First Suspected HMPV Case: 8-Month-Old Baby Admitted to Bengaluru  Hospital - The Logical Indian

 

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस हा  पॅरामॅक्सीविरीडे (Paramyxoviridae) व्हायरस फॅमिलीचा आणि कोरोना व्हायरस हा कोरोना पॅरामॅक्सीविरीडे (Coronaviridae ) व्हायरस फॅमिलीचा भाग आहेत. असे असूनही, त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी समान आहेत.दोन्ही विषाणू प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर परिणाम करतात. दोन्ही विषाणू इनहेलेशनद्वारे आणि दूषित पृष्ठभागाच्या संपर्काद्वारे पसरतात. दोन्ही विषाणूंची लक्षणे सारखीच असतात. यामध्ये ताप, खोकला, घसादुखी, घरघर आणि श्वास घेण्यात अडचण यांचा समावेश आहे. मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना दोन्ही विषाणूंचा सर्वाधिक धोका असतो. हात स्वच्छ ठेवणे, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग हे दोन्ही व्हायरस टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय आहेत.


Are Your Products Free of Coronavirus? | Charles River


हा नवीन विषाणू नाही. गेल्या वर्षी चीनमध्येही त्याचा प्रसार झाल्याची बातमी आली होती. २०२३ मध्ये नेदरलँड, ब्रिटन, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्येही हा विषाणू आढळून आला होता. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, २००१ मध्ये नेदरलँड्समध्ये हे प्रथम आढळले. तथापि, हा किमान ५० वर्षांचा व्हायरस असल्याचा मानला जातो. आबाबतची अन्य एक महत्वाची बाब म्हणजे या व्हायरस कोविडसारखा स्फोटक पद्धतीने फैलाव होत नाही. 


COVID-19, Flu and RSV - What makes them different?


एचएमपीव्ही विषाणूसाठी अद्याप कोणतेही अँटीव्हायरल औषध बनलेले नाही. तथापि, बहुतेक लोकांवर त्याचा प्रभाव पडतोच . मात्र त्याची लक्षणे घरी राहूनच नियंत्रित करता येतात. ज्या लोकांना गंभीर लक्षणे दिसतात त्यांना ऑक्सिजन थेरपी, आयव्ही थेरपी आणि कॉर्टिकोस्टिरॉईड्स (स्टेरॉईड्सचा एक प्रकार) दिला जाऊ शकतो. या विषाणूचा सामना करण्यासाठी अद्याप कोणतीही लस विकसित झालेली नाही. मात्र सध्याची स्थिती पाहता ती निर्माण करण्याची वेळ आली आहे हे मात्र नक्की. 


HPV Vaccine Benefits: Protecting Women in Pregnancy and Beyond

हेही वाचा