बेळगावातील नामवंत आस्थापनांचा समावेश : सांस्कृतिक कार्यक्रमांसह बक्षिसे जिंकण्याची संधी
मडगाव : प्रुडंट मीडिया नेटवर्कतर्फे मडगाव येथील बीपीएस स्पोर्टस क्लब येथे गोवा बेळगाव एक्स्पो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यात बेळगाव व गोव्यातील नामवंत आस्थापनांचा समावेश राहणार आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, फूडकोर्ट व लकी ड्रॉमध्ये बक्षिसे जिंकण्याची संधीही प्रदर्शनात येणार्या ग्राहकांना मिळणार आहे.
गोव्यातील नागरिकांना आता खरेदीसाठी बेळगावात जाण्याची गरज पडणार नाही. कारण प्रुडंट मीडिया नेटवर्ककडून बेळगावातील विविध नामवंत आस्थापनांचा सहभाग असलेल्या प्रदर्शन व विक्रीचा नवा उपक्रम राबवण्यात येत आहे. मडगाव येथील बीपीएस स्पोर्टस क्लब येथे ९ ते ११ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंतच्या वेळेत हे प्रदर्शन ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. गोवा बेळगाव एक्स्पोमध्ये बेळगाव व गोव्यातील आस्थापनांनी सहभाग घेतलेला आहे. या प्रदर्शन व विक्रीमध्ये फर्निचर, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे रेडिमेड कपडे, १ ग्रॅम सोन्यापासून निर्माण केलेले दागिने, हार्डवेअर अशी विविध स्टॉल्स असतील. बेळगावात खरेदीला जाण्याऐवजी बेळगावातील दुकाने गोमंतकीय नागरिकांच्या सेवेत हजर राहणार असल्याचे मनसोक्त खरेदी करता येणार आहे. याशिवाय बेळगाव व गोव्यातील नामांकित अन्नपदार्थांच्या आस्थापनांचा सहभाग असलेल्या फूडकोर्टमध्ये विविध डिशेशचा स्वाद चाखता येणार आहे. प्रदर्शन व विक्रीच्या उपक्रमावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले असून विविध स्पर्धा घेण्यात येतील.
ग्राहकांना प्रुडंट मीडिया नेटवर्कतर्फे आकर्षक बक्षिसे
गोवा-बेळगाव एक्स्पोमध्ये सहभागी होणार्या ग्राहकांना विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही प्रुडंट मीडिया नेटवर्ककडून मिळणार आहे. यासाठी एक्स्पोमध्ये येणार्या प्रत्येक ग्राहकाला लकी ड्रॉमध्ये सहभाग घेत पारितोषिके जिंकण्याचीही संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ खरेदीच नाही तर त्यासह मनोरंजन, स्पर्धा, आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी असे आणखीही बरेच काही गोवा-बेळगाव एक्स्पोतून ग्राहकांना मिळणार आहे.