बार्देश : म्हापसा येथील अहमद देवडी खून प्रकरणातील संशयिताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th January, 04:04 pm
बार्देश : म्हापसा येथील अहमद देवडी खून प्रकरणातील संशयिताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

म्हापसा : अहमद देवडी या तरुणाच्या खून प्रकरणातील संशयितांपैकी एक असलेला बोरेश सतीश पुजारी (39, रा. शेल्डे केपे व मूळ गोकाक कर्नाटक) याचा कळंगुटमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

ही घटना मंगळवारी ७ रोजी रात्री घडली. बोरेश हा सध्या कळंगुटमध्ये वास्तव्यास होता. कळंगुटमध्ये त्याचे स्पाचे आस्थापन होते.  त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कळंगुट पोलिसांनी पंचनाम्यानंतर त्याचा मृतदेह गोमेकॉत हलवला. बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर बोरेशचा मृतदेह त्याच्या कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.शवविच्छेदन अहवालानुसार मयताचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. कळंगुट पोलिसांनी या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. 

दरम्यान, गणेशपूरी म्हापसा येथे वैयक्तिक वादातून गेल्या ३० मे २०२४ रोजी अहमद देवडी (३०, लक्ष्मीनगर, म्हापसा) व संदेश साळकर यांच्यावर खूनी हल्ला झाला होता. गोमेकॉत उपचारादरम्यान १८ जून २०२४ रोजी देवडी याचे निधन झाले  या  याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एकूण नऊ संशयितांना अटक केली होती. यात बोरेश पुजारी याचा समावेश होता. बोरेश हा याप्रकरणात सध्या जामीनावर तुरूंगाबाहेर होता. तर उर्वरित आठ संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. यप्रकरणी  पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र केले असून खटल्याची सुनावणी सुरू आहे. 

हेही वाचा