बेळगावातील नामवंत आस्थापनांचा सहभाग : कॉमेडियन जॉनी डिकॉस्टासह विविध मान्यवरांची उपस्थिती
मडगाव : प्रुडंट मीडिया नेटवर्कतर्फे मडगाव येथील बीपीएस स्पोर्टस क्लब येथे ९ ते ११ जानेवारी या कालावधीत ‘गोवा बेळगाव एक्स्पो २०२५’ चे आयोजन केले आहे. या एक्स्पोचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांच्या हस्ते दुपारी ३.३० वा. होणार आहे. यावेळी कॉमेडियन जॉनी डिकॉस्टा यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
प्रुडंट मीडिया नेटवर्ककडून बेळगावातील विविध नामवंत आस्थापनांचा सहभाग असलेल्या प्रदर्शन व विक्रीचा नवा उपक्रम राबवण्यात आला आहे. बेळगावात खरेदीला जाणार्यांना आता बेळगावातील खरेदी गोव्यातच करता येणार आहे, त्यांना बेळगावात जाण्याची गरज पडणार नाही. मडगावातील बीपीएस स्पोर्टस क्लब येथे ९ ते ११ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रदर्शन व विक्री ग्राहकांसाठी खुली असेल. गोवा बेळगाव एक्स्पोमध्ये बेळगाव व गोव्यातील सुमारे ६६ आस्थापनांनी सहभाग घेतलेला आहे. या प्रदर्शन व विक्रीमध्ये फर्निचर, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे रेडिमेड कपडे, घरासाठी आवश्यक वस्तू, चप्पल दुकाने, जीवनावश्यक वस्तू, १ ग्रॅम सोन्यापासून निर्माण केलेले दागिने, हार्डवेअर यासह बँकिंग, आयुर्वेद, आरोग्यविषयक माहिती देणारे विविध स्टॉल्स असतील. बेळगावात खरेदीला जाण्याऐवजी बेळगावातील दुकाने गोमंतकीय नागरिकांच्या सेवेत हजर राहणार असल्याचे मनसोक्त खरेदी करता येणार आहे. याशिवाय बेळगाव व गोव्यातील नामांकित अन्नपदार्थांच्या आस्थापनांचा सहभाग असलेल्या फूडकोर्टमध्ये मटन भाकरीसह विविध डिशेशचा स्वाद चाखता येणार आहे. प्रदर्शन व विक्रीच्या उपक्रमावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले असून विविध स्पर्धा घेण्यात येतील.
गोवा बेळगाव एक्स्पोमध्ये सहभागी होणार्या ग्राहकांना विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही प्रुडंट मीडिया नेटवर्ककडून देण्यात आली असून त्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहे. यासाठी एक्स्पोमध्ये येणार्या प्रत्येक ग्राहकाला लकी ड्रॉमध्ये सहभाग घेत पारितोषिके जिंकण्याचीही संधी असेल.
महिला, मुलांसाठी विविध स्पर्धा
या एक्स्पोच्या तिन्ही दिवशी दुपारच्या सत्रात जरा हटके हा कार्यक्रम होईल. यात महिलांसाठी पाककला स्पर्धा, मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे. ६ ते १० वर्षे व ११ ते १४ वर्षे वयोगट अशा दोन गटांत ही स्पर्धा होईल व आयोजकांकडून चित्रकलेसाठी केवळ कागद पुरवला जाईल, रंग व इतर साहित्य स्पर्धकाला आणावयाचे आहे. गोवा बेळगाव एक्स्पोमुळे केवळ खरेदीच नाही तर मनोरंजन, स्पर्धा, आकर्षक बक्षिसांचा खजिनाच ग्राहकांसाठी आणण्यात आलेला आहे.