तिरुपती दुर्घटना : तिरुपती बालाजी मंदिरातील चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू, तर अनेक जखमी

आजारी महिलेला प्रथमोपचार देण्यासाठी गेट उघडल्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे चेंगराचेंगरी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th January, 11:23 am
तिरुपती दुर्घटना : तिरुपती बालाजी मंदिरातील चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू, तर अनेक जखमी

तिरुपती : आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट काऊंटरजवळ बुधवारी रात्री उशिरा रात्री साडेनऊ वाजता चेंगराचेंगरी झाली. या अपघातात एका महिलेसह ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. शुक्रवार १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या १० दिवसांच्या विशेष  दर्शनासाठी वैकुंठद्वारच्या कूपनांचे वाटप सुरू होते. यासाठी मंदिर समितीने तब्बल ९१ काउंटर उघडले होते व कूपन घेण्यासाठी सुमारे चार हजारांची गर्दी होती.


हादसे के दौरान करीब 1000 से ज्यादा पुलिसकर्मी तैनात थे। महिला को सीपीआर देने की भी कोशिश की गई। - Dainik Bhaskar


दरम्यान, रांगेत उभी असलेल्या एका महिलेस सुरवातीला अवस्थ वाटू लागले व नंतर ती बेशुद्ध पडली. तिला प्राथमिक उपचार देण्यासाठी गेट उघडली तेव्हा यादरम्यान लोक गेटमधून आत शिरू लागले व चेंगराचेंगरी झाली. आजारी महिलेचाही योग्य उपचार मिळाल्याने  मृत्यू झाला.


घायलों को एंबुलेंस से अस्पताल ले जाया गया।

 

ज्या वैकुंठद्वारावर ही दुर्घटना घडली ते वैकुंठ एकादशीच्या मुहूर्तावर १० जानेवारी ते १९ जानेवारीपर्यंत उघडले जाणार होते. या १० दिवसांत पहाटे ४.३० वाजता प्रोटोकॉल दर्शन आणि सकाळी ८ वाजता श्रींचे दर्शन होणार आहे. याच साठी सर्व भाविक टोकन घेण्यासाठी रांगेत उभे होते. या १० दिवसांत किमान ७ लाख भाविक देवाचे दर्शन घेतील अशी माहिती तिरूमाला तिरूपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी जे श्यामला यांनी सांगितले. 

हेही वाचा