प्रकरणांमध्ये ५२९ टक्के वाढ : औषधांचा मोठा तुटवडा
बीजिंग : कोरोनानंतर पुन्हा एकदा चीनचा नवा व्हायरस ‘ह्युमन मेटापन्यूमो’ने जगाला घाबरवायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये व्हायरसमुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. वुहानमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. येथे १० दिवसांत एचएमपीव्ही प्रकरणांमध्ये ५२९ टक्के वाढ झाली आहे.
मुलांमधील वाढत्या केसेस पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हायरसमुळे चीनमध्ये खळबळ उडाली आहे. अँटीव्हायरल औषधांचा मोठा तुटवडा आहे. विषाणूविरोधी औषधांचा काळाबाजार सुरू झाला आहे. परिस्थिती अशी झाली आहे की अँटीव्हायरल औषधे ४१ डॉलर्समध्ये विकली जात आहेत. व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे जागतिक आरोग्य संघटना देखील तणावाखाली आहे. त्यांनी चीनकडून एचएमपीव्हीची संपूर्ण माहिती मागवली आहे. चीन अजूनही एचएमपीव्ही प्रकरणांची माहिती लपवत आहे.
केंद्र सरकारने राज्यांना इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि श्वसनाच्या आजारांवर पाळत ठेवण्याचा आणि एचएमपीव्हीच्या प्रतिबंधाबद्दल जागरूकता पसरवण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत डिजिटल बैठक घेतली.
जगभरात विषाणू पसरण्याच वेग वाढला
एचएमपी विषाणू जगभरात वेगाने पसरत आहे. भारत, मलेशिया, जपान, कझाकस्तानमध्ये प्रकरणे वाढत आहेत. ब्रिटनमध्येही संसर्ग पसरत आहे. चीनमधून आलेल्या या नवीन विषाणूमुळे संपूर्ण स्पेनमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. स्पेनमधील रुग्णालयांबाहेर रुग्णांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. ‘इन्फ्लुएंझा ए’ची ६०० हून अधिक प्रकरणे स्पेनमधील अॅलिकांट येथे आढळून आली आहेत.
भारतातील ५ राज्यांमध्ये आतापर्यंत ८ रुग्ण