मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th January, 03:13 pm
मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

दिल्ली: मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली. येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानची मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली आहे.दरम्यान महाराष्ट्रातील ईव्हीएम वरील आरोंपानाही निवडणूक आयोगाने उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आहे.   

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे:-

* विधानसभा निवडणुकीची अधिसूचना निघणार - १० जानेवारी

* उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- १७ जानेवारी

* उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख- १८ जानेवारी

* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- २० जानेवारी

* मतदानाची तारीख- ५ फेब्रुवारी

* निकालाची तारीख- ८ फेब्रुवारी

दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. या निवडणुकीत 'आप'ने ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला अवघ्या ८जागांवर विजय मिळाला होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये 'आप'ने दिल्लीत वर्चस्व राखले होते.

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अरविंद केजरीवाल नेहमीप्रमाणे लोकप्रिय घोषणा करुन दिल्लीची सत्ता राखणार की भाजप 'आप'ची राजवट उलटविण्यात यशस्वी ठरणार, हे पाहावे लागेल.

हेही वाचा