टार कँपेनर आहेत, त्यांनी शिष्टाचार आणि सभ्यता पाळावीः राजीव कुमार
नवी दिल्लीःदिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजले आहे. मतदान येत्या ५ फेब्रुवारीला होणार असून या मतदानची मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील ईव्हीएम वरील आरोंपानाही निवडणूक आयोगाने उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, गेल्या निवडणुकीत गोंधळ घातला गेला की, आमचे हेलिकॉप्टर चेक केले-त्यांचे केलं नाही, वाईट भाषा वापरली गेली. आम्ही संयम ठेवतो पण पोलिंग ऑफिसरला धमकी देण्यापर्यंत लोकांची मजल गेली. स्टार कँपेनर आहेत, त्यांनी शिष्टाचार आणि सभ्यता पाळावी. महिलांबाबत असभ्य वक्तव्य केले तर आम्ही कठोर कारवाई करू, त्यामुळे सगळ्यांचे समान चेकिंग होणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांनी भूमिका मांडली.
मतदानात आणि मतमोजणीतील मतांमध्ये फरक असल्याचे काहींनी म्हटले. पण वोटर टर्नआऊटमध्ये पोस्टल मतदान नसते हे त्यांना समजलेच नाही. एखादे मशिन सुरू झाले नाही, मॉक पोलचा डेटा हटवला गेला नाही असे अपवादाने घडते. साडेदहा लाखात एक दोन मशिनला असे होऊ शकते असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.