मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती.
पणजी : आज पर्वरी येथील मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान सरकारी नोकरीची पदे भरण्याची प्रक्रिया पुढील २ महिने सुरूच राहणार. पण, पात्र ठरणार्यांची नेमणूक एप्रिलनंतरच केली जाईल अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
वित्त खात्याचे अवर सचिव प्रणब भट यांनी काल आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत बजेट तरतुदींतील २० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम खर्च करू नये, नोकरीची नवीन पदे निर्माण करू नये असे निर्बंध घालत याबाबतचे परिपत्रक जारी केले होते. भरती रखडणार की काय अशी भीती नोकरभरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना वाटत होती. आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत यावरील संभ्रम दूर केल्याने या तरुणांना आता दिलासा मिळाला आहे.
बातमी अपडेट होत आहे.