एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे काय, त्याचा सर्वाधिक धोका कोणाला? वाचा सविस्तर

एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नसून २००१ मध्ये आढळून आला होता

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th January, 10:49 am
एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे काय, त्याचा सर्वाधिक धोका कोणाला? वाचा सविस्तर

नवी दिल्लीः करोनाच्या लाटेमधून देश सावरत असतानाच आता चीनमधून गेल्या काही आठवड्यांमध्ये एचएमपीव्ही हा व्हायरस पसरू लागला आहे. या आजारामध्ये लहान मुले आणि वृद्ध बाधीत होत असून अशक्त व्यक्तींनाही याची लागण होत आहेत. थंडीच्या महिन्यांत मोसमी कारणांमुळे श्वसन विषाणूंचा प्रसार वाढतो.

आरोग्यविषयक तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही. हा २००१ मध्ये आढळून आला होता. हा विषाणू श्वास घेताना हवेच्या माध्यमातून पसरतो आणि सर्व वयाच्या नागरिकांना होऊ शकतो. हा विषाणू हिवाळ्याच्या दिवसांत जास्त प्रमाणात पसरतो. याला घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही.

एचएमपीव्हीचा प्रसार कसा होतो?

हा विषाणू प्रामुख्याने संक्रमित व्यक्तींच्या संपर्कातून पसरतो, एकतर खोकताना किंवा शिंकताना श्वासोच्छवासाच्या थेंबाद्वारे किंवा दरवाजाच्या हँडल किंवा खेळण्यांसारख्या दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्याने. दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात आणि गर्दीच्या ठिकाणी विषाणूचा प्रसार वाढत आहे.

एचएमपीव्हीची लक्षणे काय आहेत?

एचएमपीव्हीची लक्षणे तीव्रतेत भिन्न असू शकतात आणि त्यात सामान्यतः खोकला, ताप, नाक वाहणे किंवा चोंदणे आणि घसा खवखवणे यांचा समावेश होतो. काही व्यक्तींना घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो (डिस्पनिया). काही प्रकरणांमध्ये, संसर्गाचा भाग म्हणून पुरळ देखील येऊ शकते.

एचएमपीव्ही प्रतिबंध करण्यासाठी अशी घ्या काळजी

-मास्क घालून घराबाहेर पडा.

-संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका.

-खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा.

-जास्त पाणी प्या. पौष्टिक आणि घरी बनवलेले अन्न खा.

-पुरेशी झोप घ्या.

-साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरा.

-जेवतानाही हात स्वच्छ धुवा.

-दररोज स्नान करा. स्वच्छतेची काळजी घ्या.

हेही वाचा