गुजरात : बिबट्याने काळवीटाची शिकार केल्यानंतर अन्य ७ काळवीटांचा धक्क्याने मृत्यू

शूलपाणेश्वर अभयारण्यातील अजब घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th January, 10:20 am
गुजरात : बिबट्याने काळवीटाची शिकार केल्यानंतर अन्य ७ काळवीटांचा धक्क्याने मृत्यू

शूलपाणेश्वर-केवडिया : गुजरातच्या शूलपाणेश्वर वन्यजीव अभयारण्यातून एक अतिशय विचित्र घटना उघडकीस आली आहे. येथे बिबट्याने काळवीटाची शिकार केली. यानंतर जवळच्याच भागात आणखी सात काळवीटांचे मृतदेह सापडलेत. एका साथीदाराच्या मृत्यूनंतर उरलेल्या ७ काळवीटांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांच्या मृत्यू झाला असे येथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही घटना १ जानेवारी रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

,

Parbhani News | ताडकळस जवळ वाहनाच्या धडकेत काळवीट जखमी

 

काळवीट हा अतिशय संवेदनशील प्राणी आहे. हा प्राणी बिष्णोई समाजाला पूज्य आहे. रिपोर्टनुसार एक बिबट्या अभयारण्याची सीमा ओलांडून या जंगलात आला. केवडिया जंगल परिसरात त्याने २९ डिसेंबर रोजी रात्री काळवीटाची शिकार केली. हा परिसर स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ आहे. अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी यांची रीतसर नोंद करून ठेवली. दरम्यान १ जानेवारी रोजी पाहणी करत असताना येथील पाणवठ्याच्या ठिकाणी अन्य ७ काळविटांचे मृतदेह आढळून आले. 


सलमानला जेलची हवा खायला लावणारं काळवीट नेमकं असतं कसं? - BBC News मराठी


सदर उद्यानात सुमारे ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून येथे असलेल्या विविध प्राण्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. बिबटे आणि अन्य हिंस्रक प्राणी या भागात पुन्हा येण्याची शक्यता असल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले. या घटनेनंतर पार्क ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे प्राण्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करणाऱ्या अनेक तज्ज्ञांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. 


काळवीट प्राण्याची संपूर्ण माहिती Blackbuck Animal Information In Marathi -  प्राणी जगत


प्राण्यांनाही भावना असतात. यावर भारतीय पुराण आणि शास्त्रांमध्ये अनेक प्रबंध आहेत. प्रसिद्ध तत्ववेत्ता पायथागोरस यानेही आपल्या एका नोंदीत प्राण्यांच्या भावनांची एक वेगळीच श्रेणी असते अशा आशयाची एक टिप्पणी केली होती. त्याच्या याच टिप्पणीने आजच्या प्रगत अॅनिमल सायकॉलॉजी क्षेत्राचा पाया रचला गेला.  प्राण्यांना माणसासारखेच भय, आनंद, आनंद, लाज, क्रोध, करुणा, आदर तसेच विविध प्रकारच्या भावना आणि आणि त्याहीपेक्षा बरेच काही अनुभवता येते हे प्रयोगानिशी सिद्ध देखील झाले आहे. 


The Emotional Life of Animals—And What It Means for Us


या भावनेच्या स्पेक्ट्रममधील सर्वात जटिल भावना म्हणजे सहानुभूती. सर्वच प्राणी (मानव धरून ) हे सामाजिक प्राणी आहेत. समाजात वावरत असताना विविध भावनांचा उगम आणि विस्तार होतो. एकाचे दुसऱ्याशी भावनिक संबंध निर्माण होतात. सर्वप्रथम कोणती भावना उगम पावत असेल तर ती म्हणजे सहानुभूती आणि आपुलकी. हरिण आणि तत्सम प्रजाती या फारच हळव्या आणि अतिसंवेदनशील असतात. त्यांचा कळप हा भौतिक आणि भावनिक गरजांसाठी एकमेकांवर अवलंबून असतो. 


Rising Population of Blackbucks in Rajasthan [1 min read]


कळपामधील एकजण जरी कमी झाला तर त्याचा विपरीत परिणाम हा कळपातील इतर सदस्यांवरही होतो. मानसिक स्थिती बिघडू लागते आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. मानसिक ताणामुळे हार्मोन्सची पातळी बिघडते. मूत्रपिंड निकामी होतात आणि शेवटी हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन सदर जीव मृत पावतो. अशा घटना अनादी काळापासून घडत आहेत. पण तरीही या घटनेमुळे येथील अधिकारी आणि अभयारण्याच्या बाजूला राहणाऱ्या बिष्णोई समाजात शोक पसरला आहे. 


The carcass of a protected species of blackbuck was found in Badaun |  बदायूं में संरक्षित प्रजाति के काले हिरन का शव मिला: लोहे के वायर में अटका  था शव, करंट से

हेही वाचा