कचरा व्यवस्थापनासाठी पंचायतींना यापुढे मर्जीतील कंत्राटदार नाही !

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January, 11:59 pm
कचरा व्यवस्थापनासाठी पंचायतींना यापुढे मर्जीतील कंत्राटदार नाही !

पणजी : पंचायत/नगरपालिका यापुढे पंचायत/नगरपालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापनासाठी स्वत:च्या पसंतीचे कंत्राटदार किंवा एजन्सी नियुक्त करू शकणार नाहीत. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने केलेल्या एजन्सी/कॉन्ट्रॅक्टर्सचीच नियुक्ती करावी लागेल. 

कचरा व्यवस्थापन महामंडळाने कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदारला पॅनेलमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महामंडळाने इच्छुक पक्षांकडून प्रस्ताव मागवण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.

प्रस्तावाची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी आहे. प्रस्तावाच्या कागदपत्रांसाठी १,००० रुपये शुल्क द्यावे लागेल. याशिवाय निवड झाल्यानंतर ५ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. सीलबंद लिफाफ्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.