नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी आरोपपत्र दाखल

प्रकरणात दीपाश्री सावंत मुख्य सूत्रधार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January, 11:56 pm
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी आरोपपत्र दाखल

फोंडा : सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी फोंडा पोलिसांनी उसगाव येथील एका महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्यात दीपाश्री सावंत गावस मुख्य सूत्रधार होत्या. फोंडा पोलिसांनी याप्रकरणी दीपाश्री सावंत गावस, सुनीता पाऊसकर व सागर नाईक यांना अटक केली होती.

माशेल येथील एका हायस्कूलमध्ये शिक्षेकेची नोकरी देण्यासाठी १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. तक्रारीनंतर फोंडा पोलिसांनी पोलीस कर्मचारी असलेल्या सागर नाईक याला अटक केली होती. त्यानंतर संशयिताची मामी असलेल्या मुख्याध्यापिका सुनीता पाऊसकर यांना अटक केल्यानंतर त्या प्रकरणात दीपाश्री सावंत मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. फोंडा पोलिसांनी दीपाश्री सावंत गावस यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस काढली होती. मात्र, लपून राहिलेली दीपाश्री सावंत गावस गोव्यात दाखल होताच पोलिसांनी अटक केली होती. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.