अनमोड येथील अपघातात टेम्पो चालक जागीच ठार

ट्रक चालक गंभीर : मिनी टेम्पो - ट्रकमध्ये धडक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January, 12:03 am
अनमोड येथील अपघातात टेम्पो चालक जागीच ठार

जोयडा : बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्गावर जोयडा तालुक्यातील अनमोड येथे मिनी टेम्पो आणि ट्रक यांच्यात धडक बसून शनिवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला. अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.

मिनी टेम्पो हुबळी येथून प्लायवूड भरून गोव्यात जात होता, तर ट्रक हा गोव्यातून कर्नाटकात येत असताना अनमोड येथे दोन्ही वाहनांत धडक झाली. अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला. अपघातामुळे दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.

अपघात घडल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.