कारच्या धडकेत दुचाकीचालक जखमी, चालकावर गुन्हा

नागवाडो बेताळभाटी येथे दोन दुचाकींना धडक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January, 11:43 pm
कारच्या धडकेत दुचाकीचालक जखमी, चालकावर गुन्हा

मडगाव : कारचालक संशयित पाऊलो पायरेस (रा. तळावली, नावेली) याने बेदरकारपणे गाडी चालवून नागवाडो बेताळभाटी येथे दोन दुचाकींना धडक दिली. यातील आर १५ दुचाकीचालक विष्णू गावकर (रा. चाफोली, काणकोण) याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कारचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संशयित पाऊलो पायरेस हा आपल्या ताब्यातील सेलेरिओ कार घेऊन माजोर्डा येथून बेताळभाटीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. नागवाडो बेताळभाटी येथे कारचालकाने अचानक गाडी दुसर्‍या बाजूला घेतानाच समोरुन येणार्‍या एव्हीएटर दुचाकीला धडक दिली व पुढे जात आर १५ दुचाकीला धडक दिली. अपघातात आर १५ चा दुचाकीचालक विष्णू गावकर याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. अपघातप्रकरणी कोलवा पोलिसांनी कारचालक पाऊलो याच्याविरोधात बेदरकारपणे गाडी चालवून मानवी जीव धोक्यात घातल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.