फोंडा पोलिसांची कामगिरी
फोंडा : कुर्टी येथील फ्लॅटमधील चोरी प्रकरणी संशयित अनिस अब्दुल शेख (३६, मुर्डेश्वर - कर्नाटक, मूळ उत्तर प्रदेश) याला उत्तरप्रदेश मधून अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. यापूर्वी यासिन महमद पटेल (२८, मुर्डेश्वर - कर्नाटक) व अजित रमाकांत शेट (३५, मुर्डेश्वर - कर्नाटक) या दोन संशयीताना फोंडा पोलिसांनी अटक केली होती.
कुर्टी तेथे काही महिन्यांपूर्वी फ्लॅटमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी अनिस अब्दुल शेख याला उत्तर प्रदेश मध्ये जावून ताब्यात घेतले. त्यासाठी फोंडा पोलीस स्थानकाचे एक खास पथक उत्तर प्रदेश मध्ये गेले होते. ताब्यात घेतलेल्या संशयिताला रविवारी रीतसर अटक करण्यात आली आहे.
पर्वरी पोलिसांनी अन्य चोरी प्रकरणी यासिन महमद पटेल व अजित रमाकांत शेट यांना अटक केल्यानंतर फोंडा परिसरातील या चोरीचा छडा लागला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनिस अब्दुल शेख हा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र संशयताने आपल्या मूळ गावात पळ काढल्यानंतर फोंडा पोलीस स्थानकाचे एक पथक निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशमध्ये गेले होते.