पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळ्याची सांगता आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांच्या उपस्थितीत प्रार्थना सभेने झाली. ४५ दिवसांत, सुमारे ८२ लाख लोकांनी पवित्र अवशेषाचे दर्शन घेतले.
अवशेष दर्शन सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा वापर आतापासून पर्यटक करतील, अशी माहिती अवशेष दर्शन समिती मुख्यालयाचे निमंत्रक संदीप जॅकीस यांनी सांगितले. सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेष दर्शन सोहळ्याला अपेक्षेपेक्षा जास्त भाविकांनी भेट दिली. भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने निधी दिला. याशिवाय भाविक तसेच जनतेने सहकार्य केले, असे आयोजन समितीचे निमंत्रक फादर हेन्री फाल्काओ यांनी सांगितले.