जेनो ड्रॅगन्सकडून डेझर्ट्स एन् मोअर अॅव्हेंजर्सचा पराभव

साईश हेगडे ठरला सामनावीर : सारस्वत क्रीडा संघातर्फे स्पर्धेचे आयोजन

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd January, 09:10 pm
जेनो ड्रॅगन्सकडून डेझर्ट्स एन् मोअर अॅव्हेंजर्सचा पराभव

पणजी : सहाव्या कसोटीत जेनो ड्रॅगन्सने नेट रन रेटच्या जोरावर डेझर्ट्स एन् मोअर अॅव्हेंजर्सवर ८ गडी राखून विजय मिळवला. हा सामना आर्लेम क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला होता.

जेनो ड्रॅगन्सने डेझर्ट्स एन् मोर अॅव्हेंजर्सवर ६व्या आणि अंतिम कसोटीत ८ गडी राखून विजय मिळवून मालिका ३-३ ने बरोबरीत आणली आणि नेट रनरेटवर ६ सामन्यांची डेझर्ट्स एन मोर सरसांगण ज्युनियर क्रिकेट कसोटी मालिका जिंकली.

साईश हेगडे याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले तर नित्याय कुंकळ्ळीकर याला उत्कृष्ट फलंदाज व इशान होडारकर याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पल्लवी साळगावकर, डॉ. सागर साळगावकर यांची उपस्थिती होती.

१८५ धावा, ८ बळी घेणाऱ्या साहील नेउर्नेकर याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. स्पर्धेत ४२१ धावा करणाऱ्या सनत प्रभुदेसाई याला उत्कृष्ट फलंदाज व १५ गडी बाद करणाऱ्या आहिश प्रभुगावकर याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. ११ फलंदाजांना माघारी पाठवाणारा यष्टिरक्षक विस्मय फळगावकर याला उत्कृष्ट यष्टिरक्षक व अच्युत नाईक दलाल याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवडण्यात आले.