आय रन गोवा मॅरथॉन २०२५ स्पर्धा : ४५ वर्षावरील वयोगटातून यशवंत परब, इंगा खलिस्तलोवा विजयी
स्पर्धेतील विजेते टेडी कार्दोजो, रमा टोणपे.
पणजी : रविवारी आयोजित करण्यात आलेल्या आय रन गोवा मॅरथॉनमध्ये ४५ वर्षाखालील वयोगटात शारीरिक प्रशिक्षक टेडी कार्दोजो व अर्थशास्त्राची विद्यार्थिनी रमा टोणपे यांनी २१ किलोमीटरच्या परूष व महिला विभागात पहिला क्रमांक पटकावला, त्याचबरोबर, ४५ वर्षावरील वयोगटातून पणजीच्या यशवंत परब व मॉस्कोच्या इंगा खलिस्तलोवा हिने अनुक्रमे पुरुष व महिला गटात २१ किलोमीटरच्या रनमध्ये अव्वल स्थान पटकावले.
४५ वर्षाखालील वयोगटातील २१ किलोमिटरच्या रनमध्ये, विजेत्या टेडी कार्दोजोने १ तास, २० मिनी. व १५ सेकंदात रन पूर्ण केली तर महिला गटातील विजेती रमा टोणपे हिने १ तास. ४६ मिनीटे व २८ सेकंदात ही रन पूर्ण केली. ४५ वर्षावरील गटात २१ किलोमीटरच्या रनमधला विजेता यशवंत परब याने १ तास ३१ मिनीटे व ८ सेकंदात पहिला क्रमांक पटकावला तर महिला गटातील इंगा खलिस्तलोवा हिने २ तास ४ मिनीटे व ५७ सेकंदात विजय मिळवला.आय-हेल्प फाऊंडेशन,गोवाने आयोजित केलेल्या या आय-रन मॅरथॉनच्या नविनतम पर्वामध्ये सहभाग घेतलेल्यांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात या रनद्वारे केली. या मॅरथॉनमध्ये राज्य व देशातून १५०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
१० किलोमीटरच्या ४५ वयोगटाखालील पुरुष विभागातून, ३६ मिनिटे, ४९ सेकंदात रन पूर्ण करून तितोऊंन गुईललोऊ विजयी ठरला तर, महिला विभागातून ४४ मिनिट, ७ सेकंदात रन पूर्ण करून स्वीझेल डिसोझा विजेती ठरली.
या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे म्हणून पोलिस महासंचालक आलोक कुमार, सीसीपी पणजीचे माजी नगरसेवक कबीर पिंटो मखीजा, उद्योगपती व समाजसेविका पल्लवी धेंपे तसेच उद्योगपती व आय-हेल्प फाऊंडेशन, गोवा आणि आय-रन गोवा मॅरेथॉनच्या सह-संस्थापिका नसीमा अरेवले, निष्णात फिटनेस ट्रेनर आयशा सुनील करमळकर आणि राष्ट्रीय अॅथलीट कात्या कोएलो उपस्थित होते.
५ किलोमीटरच्या कालबद्ध रनमधल्या ४५ वयोगटाखालील पुरुष विभागात प्रदीप मोटर याने पहिला क्रमांक पटकावला तर महिला विभागातून, अक्षता दोडामणी ही विजयो ठरली. ४५ वयोगटावरील पुरुष विभागात रोमेउफ डेव्हिड याने पहिला क्रमांक मिळवला तर महिला विभागातून विंदा काकोडकर विजेती ठरली.
पॅरा- अॅथेलिस्टस गटात विशांत नागवेकर विजयी
पॅरा- अॅथेलिस्टस गटात विशांत नागवेकरने पहिला क्रमांक पटकावला, तसेच स्टेनी डिसू़झा दुसरा व मोईसेस रॉड्रिगिसने तिसरा क्रमांक पटकावला. २१ किलोमीटरच्या, १० किलोमीटरच्या आणि ५ किलोमीटरच्या कालबद्ध रनमध्ये, दोन विभागातून, ४५ वयोगटाखालील आणि ४५ वयोगटावरील, पुरुष व स्त्री असे विजेते घोषित करण्यात आले.