११३ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बढती

४५ एएसआय, ४४ हेड कॉन्स्टेबल, २४ कॉन्स्टेबलचा समावेश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd January, 11:53 pm
११३ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बढती

पणजी : पोलीस स्थापना मंडळाच्या आदेशानुसार, ११३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली. यात ४५ सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय), ४४ हवालदार (एचसी)आणि २४ कॉस्टेबलचा (पीसी) समावेश आहे. याबाबत तीन वेगवेगळे आदेश जारी करण्यात आले आहेत.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पोलीस मुख्यालयाचे उपमहानिरीक्षक अजय कृष्णन शर्मा यांनी आदेश जारी करून ४५ सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) यांना पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी बढती देण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी दोन वेगवेगळे आदेश जारी केले आहेत. त्यात त्यांनी ४४ हवालदारांना (एचसी) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) पदी बढती दिली. तर दुसऱ्या आदेशात २४ कॉस्टेबलना (पीसी) पोलीस हवालदार (एचसी) पदी बढती दिली आहे.